Dam Water Reservoir Agrowon
ॲग्रो विशेष

Dam Water Reservoir : राज्याच्या प्रमुख धरणांमध्ये गतवर्षीपेक्षा २.५४ अधिक पाणीसाठा, मुळा धरण निम्मे तर उजनी प्लसमध्ये

Mula Dam Water Reservoir : राज्याच्या काना कोपऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे काही दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे पुणे विभागातील धरणे ६० टक्क्यांहून अधिक भरली आहेत. तर कोकण विभागातील धरणांनी ८० टक्कांची सीमा पार केली आहे. मात्र अद्याप छत्रपती संभाजीनगर विभागाला जोरदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. यादरम्यान अहिल्यानगर जिल्ह्याची जलदायिनी मुळा धरण आणि सोलापुरकरांची तहान भागवणारे उजणी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

जलसंपदा विभागाने दिलेल्या अहवालानुसार, राज्यातील सर्व २९९७ धरणांमध्ये ५२.५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला असून छत्रपती संभाजीनगर विभागातील धरणांमध्ये केवळ १५.०४ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे येथे बळीराज्यासह सर्वसामान्य नागरीक चिंततेत असून पावसाळी प्रतीक्षा करत आहेत.

'उजनी प्लस'मध्ये

यादरम्यान राज्यातील प्रमुख मोठ्या १३८ धरणांमध्ये ५६.१४ पाणीसाठा झाला असून सर्वाधिक पाणीसाठा कोकण विभागातील ११ धरणांमध्ये झाला आहे. येथे ८०.३६ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यापाठोपाठ पुणे विभागात गेल्या चार ते पाच दिवसात पडलेल्या मुसळधार पावसामुळे ३५ धरणांचा पाणीसाठा ६९.६८ टक्के झाला आहे. तर येथील भीमा खोऱ्यातील खडकवासला, मुळशी, पवना, कासारसाई, वडिवळे, आंद्रा, चासकमान, वडज, भुशी ही धरणे ‘ओव्हर फ्लो’ झाली आहेत. त्यामुळे या धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने सोलापुरकरांना दिलासा मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणात १ लाख ५० हजार क्युसेकने होणाऱ्या आवकमुळे धरण प्लसमध्ये गेले आहे.

मराठवाड्याच्या धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नाही

तसेच नागपूर विभागात देखील पावसाने जोर धरल्याने येथील १६ धरणांमध्ये ६३.०४ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. तर नाशिक आणि अमरावती विभागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने येथे क्रमश: ४५.१६ आणि ४४.६४ पाणीसाठा झाला आहे. तर सर्वात कमी मराठवाड्यात पाऊस झाल्याने येथील धरणांच्या पाणीसाठ्यात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. जुलै महिना संपन्याच्या वाटेवर असून येथील ४४ धरणांमध्ये फक्त १४.६६ टक्केच पाणीसाठा झाला आहे. गेल्या काही दिवसात येथे पडणाऱ्या हलक्या ते मध्यम सरींच्या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक हळुहळु होत आहे. जायकवाडीचा पाणीसाठा ५.२१ टक्क्यांवर असून तो गेल्या वर्षी २८.७९ टक्क्यांवर होता. त्यामुळे येथील हजारो गावांना पाणीटंचाईच्या झळा अद्याप सोसाव्या लागत आहेत.

मुळा धरण धरण निम्मे भरले

गेल्या दोन दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्याची जलदायिनी असलेले मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी लागली आहे. येथील हरिश्चंद्रगडकडील पाणलोटात मोठी पर्जन्यवृष्टी सुरू झाल्याने धरणाच्या पाण्यात एका सप्ताहात झापाट्याने वाढ झाली आहे. शुक्रवारी (ता.२६) सांयकाळ सहा वाजेपर्यंत २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या धरणात ५२.७५% पाणी साठा झाला. त्यामुळे मुळा धरण धरण निम्मे भरल्याची माहिती नगर पाटबंधारे कार्यकारी अभियंता सायली पाटील व शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी दिली.

तसेच शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कोतूळ येथील आवक १११५२ क्युसेक झाली. तर मागील सहा दिवसात धरणात ४५२७ दशलक्ष घनफूट पाणी साठा झाला असून फक्त २४ तासात ७३५ दशलक्ष घनफूट पाणी नव्याने आल्याचे शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी सांगितले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

Sangli Vidhansabha Election : सांगलीत भाजपचं मायक्रो प्लॅनिंग; आर. आर. आबांच्या मुलाने वादळात दिवा लावला

Lumpy Skin Disease : दिघंचीमध्ये ‘लम्पी’चा विळखा

Agrowon Podcast : कांदा बाजारभाव दबावात; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत गहू दर?

SCROLL FOR NEXT