Ujani Dam Water : सोलापूर, पुणे जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणाच्या जलाशयात वाढ, ५० टीएमसी पाणीसाठी

Solapur Ujani Dam : ७ जून ते १७ जुलै या काळात उजनीत पावसाचे १९ टीएमसी पाणी जमा झाले आहे.
Ujani Dam Water
Ujani Dam Wateragrowon
Published on
Updated on

Ujani Dam Water Solapur : सोलापूर जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील बहुतेक उद्योगांना उजनी धरण वरदायिनी आहे. परंतु मागच्या वर्षभरातील दुष्काळाच्या स्थितीने उणे ६० टक्क्यांवर पहिल्यांदाच पोचलेल्या उजनी धरणात ५० टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. ७ जून ते १७ जुलै या काळात उजनीत पावसाचे १९ टीएमसी पाणी जमा झाले आहे. आता उजनी प्लसमध्ये येण्यासाठी आणखी २५ पावले पार करावी लागणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणामुळे साखर करखानदारी आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले आहे. उजनी धरणातील ११७ टीएमसी पाणी मावते, पण त्यातील ८४ टीएमसीच पाणी दरवर्षी वापरण्याचे नियोजन ठरले आहे.

यंदा उजनी धरण उणे ६० टक्क्यांपर्यंत पोचल्याने सोलापूर महापालिकेला धरणावर दुबार, तिबार पंपिंग करावे लागले होते. आता धरण उणे २५ टक्क्यांवर (उणे १२ टीएमसी) आले आहे. ७ जूनपासून पुणे जिल्ह्यातील व धरण परिसरातील पावसामुळे धरणात १९ टीएमसी पाणी आले आहे.

धरणात अजून ६७ टक्के पाणी अपेक्षित आहे. पावसाळा सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे, पण पुणे जिल्ह्यातील धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात विशेषत: धरण क्षेत्रात देखील समाधानकारक पाऊस झालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्याच्या वरदायिनीला प्लसमध्ये येऊन पूर्ण भरायला वाट पाहावी लागणार असल्याची स्थिती आहे. गतवर्षी जुलैअखेर धरण प्लसमध्ये होते.

धरणातील पाण्याची सद्य:स्थिती

एकूण साठवण क्षमता ११७ टीएमसी, सध्याचा पाणीसाठा ५० टीएमसी, पाण्याची टक्केवारी उणे २६ टक्के, धरणातील पाण्याची आवक ६,८०० क्युसेक

Ujani Dam Water
Ujani Tourism : उजनी पर्यटन विकास आराखड्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर

शेतीला मिळेल एक आवर्तन जास्त

सोलापूर शहरासाठी दरवर्षी भीमा नदीतून पिण्यासाठी पाणी सोडले जायचे. पण, आता शहरासाठी सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनी टाकली जात असून, त्याचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुढील उन्हाळ्यात सोलापूरसाठी नदीतून दोन-तीन आवर्तने सोडावी लागणार नाहीत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आवर्तन जास्तीचे मिळू शकते, अशी आशा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com