Pune APMC
Pune APMC  Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC : पुणे बाजार समितीत शेतीमालाच्या चोऱ्यांमध्ये वाढ

गणेश कोरे

Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळे-भाजीपाला, गूळ-भुसार बाजारात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. बाजारात सातत्याने चोऱ्या होत आहेत. ठरवून दिलेल्या संख्येत सुरक्षा रक्षक उपस्थित नसल्याने चोरांचे चांगलेच फावले आहे. या चोऱ्यांबाबत अडते पोलिस आणि बाजार समितीकडे तक्रार देण्यास धजावत आहेत. याबाबत अडते असोसिएशन देखील मूग गिळून गप्प बसल्याचे सध्याचे चित्र आहे.

पुणे बाजार समितीमध्ये राज्य आणि परराज्यांतून मोठ्या प्रमाणावर फळे-भाजीपाल्यांची आवक होत आहे. बाजार आवारातील वाहतूक कोंडी आणि सुरक्षेसाठी भाजीपाला विभागात ८० सुरक्षा रक्षक आहेत. तर, गूळ-भुसार बाजारात ६३ सुरक्षा रक्षक आहेत. दोन्ही विभागात शेतमाल चोऱ्यांसह अनेक ठिकाणी कॅमेरा, एसीचे बॉक्स, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या तोडफोडीच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.

मागील काही महिन्यांपूर्वी गूळ-भुसार बाजारात नेहरू रस्त्यावरील दोन दुकाने फोडली होती. त्यापैकी एका दुकानातून सुमारे ३० हजार रुपयांची, तर भगवती ट्रेडर्स या दुकानातून सुमारे तीन लाखांची चोरी झाली होती. बाजारातील कांदा, लसूण, आले या फळभाज्यांचे भाव वाढल्याने त्यांच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोऱ्यांमुळे बाजार घटक त्रस्त झाले असून शेतकरी, अडतदार यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

मात्र, याबाबत अडते असोसिएशन कोणतीही भूमिका घेण्यास तयार नसल्याचे अनेक आडते खासगीत सांगत आहेत. तर होणाऱ्या चोऱ्यांबाबत तक्रार देण्यास देखील अडते धजावत आहेत. यामुळे झालेले नुकसान शेतकऱ्यांना भरून द्यावे लागत आहेत.

तर फळबाजारात अनेक प्रकारच्या विदेशी फळांची चोरी होत आहे. या चोरीबाबत चोरांना हटकले तर ते रात्री-अपरात्री कामगारांना धमकावत असल्याने होणारी चोरी अडते सहन करत असल्याचे चित्र आहे.

शेतीमालाच्या चोरीच्या वाढलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता.८) अडते असोसिएशनचे अध्यक्ष, पदाधिकारी, अडतदार, ठेकेदार, उपसभापती, सचिव यांची संयुक्त बैठक घेतली. यापुढील काळात शेतीमालाच्या चोऱ्या झाल्यास नुकसानीचा खर्च हा संबंधित ठेकेदारांच्या बिलातून वजा करण्याचा निर्णय झाला आहे. शेतकरी, अडत्यांच्या हितासाठी चोऱ्या ‍न थांबल्यास वेळप्रसंगी सुरक्षा रक्षक ठेकेदार बदलले जाईल. तर, संबंधित विभाग प्रमुखांनी, अधिकाऱ्यांनी वचक न ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे
बाजार आवारात फळे-भाजीपाला, लसूण, कांदा- बटाटा विभागांत बहुतांशी अडत्यांच्या शेतीमालाच्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. अडत्यांना दिवसेंदिवस बाजारपेठेत असुरक्षितता भासत आहे. वेळेवर देखभाल आणि सेस भरूनही शेतीमालाच्या चोऱ्या होत आहेत. व्यापाऱ्यांना जाचक त्रास सहन करावा लागत आहे.
- सौरभ कुंजीर, उपाध्यक्ष, अडते असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : कोकण, घाटमाथ्यावर मध्यम पावसाची हजेरी

Maharashtra Rain Alert : कोकणात मुसळधारेचा इशारा

Onion Kharif Sowing : कांद्याचा पुरेसा स्टाॅक, लागवडीत २८ टक्के वाढ? कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील असा सरकारचा विश्वास

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'त काळाबाजार आढळल्यास थेट कारवाई, पालकमंत्री मुश्रीफांचे पोलिसांना आदेश

Crop Insurance : राज्य सरकार पंतप्रधान पीक विमा योजनेला पर्याय का शोधत आहे ?

SCROLL FOR NEXT