Ethanol Production Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Production : देशाच्या इथेनॉल उत्पादन क्षमतेत १६२३ कोटी लिटरपर्यंत वाढ

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता ऑगस्टअखेर १६२३ कोटी लिटरपर्यंत वाढली आहे. केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही माहिती दिली.

२०१७-१८ ला ही क्षमता ५१८ कोटी लिटर होती. केंद्राने सातत्याने इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न केल्याने उत्पादन क्षमतेमध्ये वाढ झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये इथेनॉल निर्मितीला बळ देण्याची शक्यता असल्याने या क्षमतेत वाढ होणार असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

अलीकडेच, सरकारने साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना इथेनॉल पुरवठा वर्ष २०२४-२५ दरम्यान उसाचा रस, बी-हेवी मोलॅसिस आणि सी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल तयार करण्याची परवानगी दिली आहे. या व्यतिरिक्त, सरकारने पूर्वीची बंदी उठवली आहे आणि २३ लाख टन तांदूळ भारतीय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्टॉकमधून धान्य-आधारित इथेनॉल डिस्टिलरींना विकण्याची परवानगी दिली आहे. यामुळे इथेनॉल उत्पादनात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.

इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध हटविण्याचा विचार

केंद्र सरकार इथेनॉल निर्मितीवरील सर्व निर्बंध हटवण्याच्या विचारात आहे. मध्यंतरी आततायीपणे घेतलेल्या इथेनॉलनिर्मिती निर्बंधाच्या निर्णयाचा पश्चाताप करण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे. अनेक नवीन प्रकल्प सुरू होण्याआधीच बंद राहिले. याचा फटका इथेनॉल उत्पादनाला बसला. आता ही चूक सुधारून इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला बाधा येईल, असे निर्णय न घेण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एकत्रित इथेनॉल मिश्रण पोहोचले १३.३ टक्क्यांपर्यंत वाढत्या क्षमतेमुळे देशांतर्गत इथेनॉलच्या गरजा पूर्ण होतील, असा केंद्राचा विश्वास आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, अंदाजे १०१६ कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता असेल, इतर वापरांसाठी एकूण १३५० कोटी लिटर इथेनॉल लागणार आहे. २०२५ पर्यंत सुमारे १७०० कोटी लिटर इथेनॉल उत्पादन क्षमता आवश्यक आहे. नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ पर्यंत एकत्रित इथेनॉल मिश्रण १३.३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

NAFED Issue : नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT