Sugar Price Hike agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Price Hike : ऐन निवडणुकीत साखरेच्या दरात तेजी, क्विंटलचा दर वाढल्याचा कोणाला फायदा?

Price of Sugar : राष्ट्रीय बाजारात साखरेचा दर ७५ रुपयांनी वाढून क्विंटलला ३,९०० ते ३,९५० रुपयांवर पोहोचला आहे.

sandeep Shirguppe

Central Government : केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला साखरेचा कोटा ठरवला जातो. दरम्यान साखरेची निर्यात बंदी लागू करण्यात आल्याने जागतिक बाजारपेठेत साखरेच्या दरात घसरण होताना पहायला मिळाली. केंद्राकडून लग्न सराई आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा मे महिन्यातील साखरेचा कोटा वाढवला आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत २ लाख टनांनी साखरेचा कोटा वाढण्यात आला आहे.

केंद्र सरकारने मे महिन्यातील मागणीचा विचार करून २७ लाख टन साखरेचा मुबलक कोटा खुला केला. परंतु साखरेचा खुला केलेल्या कोट्याचा बाजारात उलटा परिणाम होताना दिसत आहे, सट्टेबाजांच्या सक्रियतेमुळे साखरेच्या तेजीला उधाण आल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रीय बाजारात साखरेचा दर ७५ रुपयांनी वाढून क्विंटलला ३,९०० ते ३,९५० रुपयांवर पोहोचला आहे. महिन्याचा सुरुवातीचा आठवडा असल्याने बाजारात साखरेला मागणीही चांगली असल्याने तेजीला हातभार लागत असल्याचा अंदाज व्यापाऱ्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्राने साखरेचा मुबलक कोटा दिल्याने खरे तर साखरेचे दर क्विटलला पन्नास रुपयांनी कमी होण्याची अपेक्षा बाजारपेठेतून वर्तविण्यात येत होती. शिवाय, देण्यात आलेला मुबलक कोटा इलेक्शन कोटा असल्याचे बोलले जात आहे. मात्र, साखरेचे निघणारे टेंडरही क्विंटलला ३,६०० ते ३,६५० रुपयांवर पोहोचले आहेत.

सट्टेबाजांची सक्रियता हे त्यामागे महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत साखरेच्या दरातील तेजी हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे मागणी वाढल्यास तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.

किमान विक्री दरवाढीच्या शक्यतेने 'बूस्टर' केंद्र सरकारकडून साखरेचा किमान विक्री दर क्विटलला ३,१०० वरून ३,५०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक करण्याची साखर उद्योगाची जुनी मागणी आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर त्यावर काही ना काही सकारात्मक निर्णय होण्याची चर्चा घाऊक बाजारपेठांमध्ये सुरू आहे. त्याचा फायदा घेत सट्टेबाजांकडून साखरेची खरेदी वाढण्यास सुरुवात झाल्याने अनपेक्षित तेजी आल्याचे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

Illegal Agri Inputs: अवैधतेचे गुजरात मॉडेल

Vidarbha Irrigation Project: विदर्भातील १३ सिंचन प्रकल्प रद्द

Land Acquisition Law: भूसंपादन कायद्यातील बदलाबाबत सरकार गंभीर

BG II Cotton: ‘वनामकृवि’ कडून कपाशीचे सरळ वाण बीजी II मध्ये परिवर्तित

SCROLL FOR NEXT