pomegranate Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Pomegranate Export : देशातून डाळिंबाच्या निर्यातीत वाढ

Pomegranate Production : प्रतिकूल परिस्थितीही निर्यातीसाठी शेतकऱ्यांचा पुढाकार; ७२ हजार टन निर्यात

Team Agrowon

अभिजित डाके ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangali News : सांगली ः गेल्या दोन ते तीन वर्षांत देशातील डाळिंब पिकावर नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढावले होते. परिणामी डाळिंबाची उत्पादनात घट असूनही डाळिंबाची निर्यात करण्यासाठी शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा साधल्या. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत जगभरातील ४५ ते ५० देशांतील बाजारपेठेत डाळिंबाची निर्यात झाली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून पुन्हा डाळिंब निर्यातीत वाढ होऊ लागली असल्याचे चित्र आहे. सन २०२३-२४ या वर्षात डाळिंबाची ७२ हजार ११ टन निर्यात झाली असून, सन २०२२- २३ च्या तुलनेत ९ हजार ७३२ टनांनी निर्यात वाढली आहे. निर्यात वाढीमुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिसाला मिळाला आहे.

देशात डाळिंबाचे क्षेत्र सुमारे २ लाख ७६ हजार हेक्टर आहे. देशातून डाळिंबाची निर्यात मोठ्या प्रमाणात होते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये डाळिंबाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. प्रामुख्याने युरोपसह अरब अमिराती, बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि थायलंड या देशांत भारतातून डाळिंब निर्यात होते. २०२१-२२ मध्ये भारतातून ९९ हजार ०४३ टन डाळिंबाची निर्यात झाली होती. २०२०-२१ च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये ३१ हजार टनाने निर्यातीत वाढ झाली होती. त्यामुळे देशातून डाळिंबाची निर्यात वाढीचा आलेख वाढत चालला होता.

मात्र गेल्या तीन वर्षांपूर्वी देशभरातील डाळिंबावर पिनहोल बोरर, शॉट होल बोरर या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यातच नैसर्गिक संकटामुळे तेलकट, मर सारख्या रोगाचाही फटका डाळिंबाला बसला होता. पिनहोल बोरर, शॉट होल बोरर या रोगामुळे डाळिंबाच्या बागा काढण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे दुसरा पर्याय नव्हता. यासाऱ्या परिणाम निर्यातीवर झाला. त्यामुळे २०२२-२३ या वर्षात डाळिंबाची निर्यात रोडावली होती. २०२२-२३ या वर्षात डाळिंबाची ६२ हजार २८० टनांची निर्यात झाली होती. २१-२२ च्या तुलनेत २२-२३ या वर्षात ३६ हजार ७६३ टनांनी निर्यात घटली होती.

वास्तविक पाहता, नैसर्गिक संकट, आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी सतत फवारण्या कराव्या लागल्या. त्यामुळे रेसिड्यू फ्री डाळिंबाचे उत्पादन शक्य झाले नाही. परिणामी, युरोपियन देशातही निर्यात किंचित वाढली आहे. युरोपसह अरब अमिराती, बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड, सौदी अरेबिया, श्रीलंका आणि थायलंड यांसह सुमारे ४५ देशात डाळिंबाची निर्यात होत आहे. गेल्या वर्षभरापासून या देशातील बाजारपेठांमधून पुन्हा डाळिंबाची मागणी हळू हळू वाढू लागली आहे. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही देशातून डाळिंबाची निर्यात करण्यासाठी शेतकरी रेसिड्यु फ्री डाळिंबाचे उत्पादन घेण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. गेल्या वर्षापासून देशातून डाळिंबाची निर्यात वाढली असून बांगलादेश आणि अरब अमिराती या देशांकडेही डाळिंबाची निर्यातीचा कल वाढला आहे.

डाळिंब नैसर्गिक आपत्तीच्या कचाट्यात सापडले होते. त्यामुळे निर्यातीवर परिणाम झाला होता. परंतु शेतकरी या संकटावर मात करत निर्यातीसाठी पुढे आले आहेत. ही बाब चांगली आहे. मात्र युरोपियन देशात निर्यात मंदावली आहे. युरोपसह अन्य देशात डाळिंबाची निर्यात वाढावी यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न झाल्यास निर्यात वाढीस मदत होईल.

- प्रभाकर चांदणे,

अध्यक्ष, अखिल भारतीय डाळिंब संघ

देशातून डाळिंबाची झालेली निर्यात व उलाढाल

वर्ष....निर्यात (टन) उलाढाल (कोटी)

सन २०२०-२१...६७,९७६...५१६ कोटी ६६ लाख

सन २०२१-२२...९९,०४३...६८८ कोटी ७७ लाख

सन २०२२-२३...६२,२८०...४७० कोटी १७ लाख

सन २०२३-२४...७२,०११...५७२ कोटी ५१ लाख

(स्त्रोत ः अपेडा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Center : कोरेगावात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

Sugarcane Farming : शाहूवाडी परिसरात खुंटली आडसाली उसाची वाढ

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकऱ्याचा मोठा आधार

Water Crisis : ‘मोरणे’चे पात्र पडू लागले कोरडे

Achalpur APMC : अचलपूर बाजार समिती देणार व्यापाऱ्यांना ओळखपत्र

SCROLL FOR NEXT