Pomegranate Export : देशातून डाळिंबासह दाण्यांची निर्यात रोडावली

Pomegranate Market : देशात गेल्या दोन वर्षांत डाळिंबावर ‘तेलकट डाग रोग’, मर, कुजवा आणि ‘पिन होल बोअर कीड’ आदींचा प्रादुर्भाव झाला.
Pomegranate
Pomegranate Agrowon

Sangli News : देशात गेल्या दोन वर्षांत डाळिंबावर ‘तेलकट डाग रोग’, मर, कुजवा आणि ‘पिन होल बोअर कीड’ आदींचा प्रादुर्भाव झाला. याचा फटका डाळिंबाबरोबर त्याच्या दाण्यांच्या निर्यातीवर होऊन निर्यात रोडावली आहे.

यंदाच्या हंगामात नोव्हेंबरअखेर सुमारे ३८ हजार टन डाळिंब आणि दाण्यांची निर्यात झाली आहे. ही निर्यात यंदा कमीच राहील, असा अंदाज डाळिंब उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.

भारत डाळिंब उत्पादनात अग्रेसर आहे. देशात जवळपास डाळिंबाचे क्षेत्र २ लाख हेक्टर १५ हजार हेक्टर आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातसह दहा राज्यांत डाळिंबाचे उत्पादन होते. सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्रात आहे. वर्षभर देशातून युरोपासह आखाती, ओमान, बहरीन, श्रीलंका, बांगलादेश, कतार, नेदरलॅण्डसह सुमारे ३० हून अधिक देशात डाळिंबाची निर्यात होते.

डाळिंबाच्या दाण्यांचीही मागणी परदेशातून वाढली आहे. त्यामुळे रासायनिक अवशेषमुक्त (रेसिड्यू फ्री) मालाच्या निर्यातीसाठी बागायतदारांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत डाळिंबाला देशांतर्गत मागणी असून दरही चांगले असल्याने डाळिंबासह दाण्यांची निर्यात वाढली आहे.

Pomegranate
Pomegranate Farming : डाळिंब लागवडीत मृग बहराचे नियोजन

दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून डाळिंबाला नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. त्यातच ‘तेलकट डाग रोग’, मर, कुजवा आणि ‘पिन होल बोअर कीड’ यांचा मोठा प्रादुर्भाव झाला. यामुळे शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या.

मुळात देशभरातील बाजारपेठेत डाळिंबाला चांगले दर मिळाले. त्यामुळे उत्पादकांनी निर्यात करण्यापेक्षा देशभरातीलच बाजारपेठेत डाळिंब विक्रीस पसंती दिली. त्यामुळे २२-२३ मध्ये डाळिंबाची निर्यात कमी झाली.

जगभरात डाळिंबाला मागणी आहे. २०२२-२३ मध्ये ६२ हजार टनांची निर्यात झाली तर ४७० कोटींची उलाढाल झाली. परंतु देशांतर्गत चांगल्या दरामुळे ‘रेसिड्यू फ्री’ उत्पादन घेण्यासाठी शेतकरी पुढे आले नाहीत.

त्यामुळे निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन घटले आहे. परिणामी डाळिंब व त्याच्या दाण्यांची निर्यातही घटली आहे. २०२३-२४ म्हणजे एप्रिल ते नोव्हेंबर अखेर ३८ हजार टन डाळिंब निर्यात झाली असून ३७० कोटींची उलाढाल झाली आहे.

Pomegranate
Pomegranate Export : अमेरिकेला डाळिंबाची निर्यात सुरू

निर्यातक्षम उत्पादनात घट

राज्यातून डाळिंबासह निव्वळ डाळिंबाच्या दाण्यांची निर्यात सर्वाधिक होते. गतवर्षी ४८ हजार टन निर्यात झाली असून ३१५ कोटी रुपयांची उलाढाल झाली होती. यंदा ३१ हजार टन डाळिंब जगातील बाजारपेठेत पोहोचले असून २२२ कोटी इतकी उलाढाल झाली आहे. परंतु राज्यात निर्यातक्षम डाळिंबाचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे राज्यातूनही निर्यात घटली आहे.

देशातून डाळिंब आणि दाण्यांची निर्यात

वर्ष.... निर्यात (टनात).... उलाढाल (कोटी रुपये)

२०२१-२२...९९ हजार...६८८

२०२२-२३...६२ हजार...४७०

२०२३-२४...३८ हजार...३७० (नोव्हेंबर अखेर)

देशातील डाळिंबाला जगभरातील मार्केटमध्ये मागणी आहे. परंतु ‘पिन होल बोअर कीड’, ‘तेलकट डाग’ रोगामुळे डाळिंबाचा दर्जा घसरला आहे. त्यामुळे निर्यात कमी झाली आहे. मात्र यावर्षी निर्यात वाढत आहे.
- गोविंद हांडे, निर्यात सल्लागार, कृषी आयुक्तालय, पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com