Cotton Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Crop : कपाशीवर आकस्मिक ‘मर’, शेतकऱ्‍यांच्या संकटात भर

Cotton Wilt : यंदा मराठवाड्यात पावसाचा खंडा पडला आहे. त्यात कपाशी पिकांत आकस्मिक ‘मर’चा प्रादुर्भाव झाला आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News : आधीच संकटे कमी की काय म्हणून आता प्रचंड उशिरा का होईना पडलेल्या पावसामुळे उत्पादनाची थोडीबहुत आशा लागून असलेल्या कपाशीवर आकस्मिक ‘मर’चा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर आपत्ती ओढावली आहे.

यंदा मराठवाड्यात कपाशीची अपेक्षित लागवड झाली नाही. जवळपास ८९ टक्के कपाशीची लागवड झाली. त्यात पावसाने पिकांचा चांगलाच खेळ मांडला. ऐन वाढीच्या अवस्थेत पावसाने दांडीमुळे कपाशीची वाढ खुंटली. पावसाचे प्रदीर्घ खंड कसेबसे पार करत वाढ न झालेल्या कपाशीला पाते लागण्याच्या अवस्थेतच पुन्हा एकदा पावसाच्या खंडाचा सामना करावा लागला.

त्यामुळे सातत्याने प्रदीर्घ पावसाचा खंड अनुभवलेल्या कपाशी उत्पादनात घट येणार हे स्पष्टच आहे. त्यात आता नव्या संकटाने भर टाकली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव, फुलंब्री, वैजापूर, पैठण या तालुक्यांतील कपाशी पिकांत आकस्मिक ‘मर’चा प्रादुर्भाव झाला आहे.

आमची एक हेक्टर कपाशी पाऊस उघडल्यानंतर अचानक सुकून गेली. उरलेली ही सुकण्याच्या मार्गावर आहे. कृषी यंत्रणेला माहिती दिली. त्यांनी सुचविलेला उपाय करून पाहिला. परंतु उपयोग झालेला दिसत नाही. काका काशिनाथ औटे व काकू मंदाबाई औटे यांच्या प्रत्येकी १ हेक्टर ७२ आर शेतातील कपाशीची देखील अशीच अवस्था आहे.
- गणेश औटे, तिडका, ता. सोयगाव.

सोयगाव तालुक्यातील वरठाण, बनोटी, पळाशी, तिडका या गावांत आकस्मिक ‘मर’मुळे कपाशीचे पीक मोठ्या प्रमाणात हातचे जाण्याच्या मार्गावर आहे. पावसाची उघडीप होते आहे, तसे आकस्मिक ‘मर’चे प्रमाण प्रकर्षाने दिसून येत आहे. अशीच स्थिती कमी अधिक प्रमाणात इतरही तालुक्यांतील कपाशी पीक क्षेत्रात प्रक्षेत्र पाहणीत दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याविषयी तज्ज्ञांनी तत्काळ कृषी विभागाच्या यंत्रणेला अलर्ट करून उपाय सुचविण्याचा प्रयत्न केला आहे.

...अशा करा उपाययोजना

विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. एस. बी. पवार व वनस्पती रोग शास्त्र सहयोगी प्राध्यापक डॉ. दिलीप हिंगोले यांच्या माहितीनुसार, मराठवाड्यात मागील एक-दोन दिवसांपासून काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जास्त पाऊस पडत आहे. त्यापूर्वी पावसाचा खंड पडलेला होता. अशा भिन्न परिस्थितीत बीटी कापूस पिकावर आकस्मिक मर आली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी १०० लिटर पाण्यात युरिया दीड किलो अधिक म्युरेट ऑफ पोटॅश दीड किलो अधिक कॉपर ऑक्सिक्लोराईड २५० ग्रॅम असे प्रमाण घेऊन द्रावण तयार करावे.

त्याची झाडाच्या बुंध्याजवळ  १०० ते १५० मिली प्रमाणात आळवणी करावी. दोन पायांतील बोटात झाड धरून झाडाचा बुंध्याशेजारील माती दाबून घ्यावी. तसेच या सोबत साचलेले पाणी प्रथम शेताबाहेर काढावे.  किंवा ट्रायकोडर्मा या बुरशीनाशकाची कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने आळवणी करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT