Tur Pest Management Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Pest : मराठवाड्यात तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

Tur Pest Management : मराठवाड्यातील तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा (हेलिकोवर्पा) प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे.अनेक भागात या कीडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्याचे दिसत आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Parbhani News : परभणी ः मराठवाड्यातील तूर  पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा (हेलिकोवर्पा) प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे.अनेक भागात या कीडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्याचे दिसत आहे. ढगाळ वातावरणामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी या अळीचे वेळीच नियंत्रण करावे, असे कृषी कीटकशास्त्रज्ञांनी सांगितले.

मराठवाड्यामध्ये तूर पीक फुलोरा तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. सध्याच्या ढगाळ वातावरणामध्ये तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. शेंगमाशीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास तुरीमध्ये अडकण होते. मालाचा दर्जा खालावतो. उत्पादन घट येते. हेलिकोवर्पा च्या नियंत्रणासाठी पूर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात.

हेलिकोवर्पा अळीची आर्थिक नुकसानीची पातळी ओळखण्यासाठी प्रतिएकरी २ कामगंध सापळे लावावेत. शेतामध्ये इंग्रजी ‘T’ आकाराचे प्रतिएकरी २० पक्षी थांबे लावावेत. पक्षाद्वारे अळ्या वेचून खाल्याने प्रादुर्भाव कमी होईल. तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवा. पोत्यावर पडलेल्या अळ्या वेळोवेळी जमा करून नष्ट कराव्यात.

या किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर कीटकशास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉ. डी. डी. पटाईत, डॉ. जी. डी. गडदे, एम. बी. मांडगे यांनी केले. अधिक माहितीसाठी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी, दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा व्हॉटसॲप हेल्पलाइन क्रमांक ८३२९४३२०९७ वर संपर्क करावा.

सात एकरवरील तुरीचे पीक फुलोरा, शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. मागील चार-पाच दिवसांपासून शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. काल व परवा कीटनाशकांची फवारणी केली आहे.
- चंद्रकांत कच्छवे,
शेतकरी, दैठणा, ता. जि. परभणी

ढगाळ वातावरणामुळे मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत तूर पिकावर हेलिकोवर्पा म्हणजेच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. अनेक भागांत आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्याचे दिसत आहे. वेळीच नियंत्रण न केल्यास २० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.
- डॉ. डी. डी. पटाईत,
कीटकशास्त्रज्ञ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heavy Rain In Maharashtra: राज्यात मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका; गावांमध्ये शिरले पाणी, बचावकार्य सुरु

Konkan crop advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Election Commission: निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना इशारा; तर विरोधकांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोगाचा विचार

Heavy Rain : जोरदार पावसाने पश्चिम विदर्भात धुमाकूळ

India Security: आस समृद्धी अन् सुरक्षेची!

SCROLL FOR NEXT