Kharip Season : तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव

Cultivation in Kharip : यंदाच्या खरिपातील लागवड झालेले तुरीचे बहुतांश पीक सध्या फुलोरावस्थेत आहे. काही ठिकाणी शेंगा धरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पिकावर याच अवस्थेत शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे.
Worm
WormAgriculture
Published on
Updated on

Akola News : यंदाच्या खरिपातील लागवड झालेले तुरीचे बहुतांश पीक सध्या फुलोरावस्थेत आहे. काही ठिकाणी शेंगा धरण्याची प्रक्रिया सुरू आहे. पिकावर याच अवस्थेत शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. बदलेले वातावरण या अळीसाठी पोषक बनले आहे.

Worm
Bhogavati Sugar Factory : भोगावती साखर कारखान्याचा प्रचार थांबला, गुप्त हालचालींना वेग, उद्या मतदान

यंदाच्या हंगामात तुरीची लागवड झालेल्या क्षेत्रात मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. बऱ्याच भागात यामुळे तुरीची झाडे उभी वाळून गेली. त्‍यानंतर आता तुरीचे पीक फुलोरा व शेंगा धरण्याच्या प्रक्रियेत असताना शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. वातावरण बदलामुळे पिकावर अळ्यांचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Worm
Pink Bollworm : बोंड अळीमुळे कापूस उत्पादक संकटात

सोयाबीन पिकाची काढणी झाल्यानंतर किडीचा हल्ला आता तुरीच्या पिकावर झालेला आहे. तुरीच्या झाडावर कळी तसेच काही ठिकाणी शेंगांना ही अळी पोखरत आहे. शेंगा पोखरल्याने त्यात दाणे न भरता मुकणी तयार होत असते. त्यावर वाढणाऱ्या बुरशीमुळे दाणे कुजण्यासारखेही प्रकार घडतात. अळीचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात सध्या व्यस्त आहेत.

‘अळी फुले व शेंगाही खाते’

‘‘सध्या तुरीवर फुलोरा व शेंगा लागण्याची अवस्था सर्वत्र आहे. त्यावर शेंगा पोखरणारी अळी दिसत आहे. यालाच हिरवी बोंड अळी किंवा हरभऱ्यावरील घाटे अळी असेही म्हटली जाते. ही अळी फुले व शेंगाही खाते,’’ अशी माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापक (कीटकशास्त्रज्ञ) प्रज्ञा कदम यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com