Paddy Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Disease : इगतपुरी तालुक्यात भातावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

Paddy Crop Issue : गेल्या दहा-बारा दिवसांपासून संततधारेसह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भात पिकावर जिवाणूजन्य व बुरशीजन्य या करपा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Team Agrowon

Nashik News : भाताचे आगर आणि पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून,भात पीकही दमदार आले आहे. मात्र, गेल्या दहा-बारा दिवसांपासून संततधारेसह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भात पिकावर जिवाणूजन्य व बुरशीजन्य या करपा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या भात पिकावर संततधार पाऊस, तापमानात अचानक वाढ व उन्हाची तीव्रता वाढल्याने करपा रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून, शेतकरी हवालदिल झाले आहेत. इगतपुरी तालुक्यात यंदा भात लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून, २९ हजार २०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे.

हंगामाच्या सुरवातीला पर्जन्यमान कमी असल्याने खरिपाच्या लागवडीचा प्रश्न उभा झाला. मात्र, नंतर समाधानकारक पावसामुळे लागवड झाली. तरी अखेरच्या टप्प्यात पावसाचे दुर्भिक्ष्य काही प्रमाणात जाणवू लागल्याने उष्ण व दमट हवामान निर्माण झाले. यामुळे भातावर जीवाणूजन्य व बुरशीजन्य करपा रोगांचा प्रार्दुभाव होत असल्याचे जाणवू लागले आहे.

भातपिकाच्या वाढीच्या सर्वच अवस्थांमध्ये प्रभाव दाखवणारा बुरशीजन्य करपा रोग ‘पायरियाक्युलायरिया ओरायझी’ या बुरशीमुळे होतो. या रोगाची लक्षणे रोपाची पाने, पानाचे वरील आवरण, पेर, लोंबीचा देठ, दाण्यांच्या खालचा देठ, दाण्याची टरफले या सर्वांवर दिसतात. यात पानांवर शंखाकृती किंवा डोळ्यांच्या आकाराचे म्हणजेच मध्यभाग फुगीर आणि दोन्ही बाजूंनी निमुळते ठिपके दिसतात. या ठिपक्यांचा मध्य भाग हा राखाडी व तपकिरी रंगाचा असतो. योग्य हवामानात ठिपक्यांच्या राखाडी भागात बुरशीची वाढ होते. अशा प्रकारे अनेक ठिपके एकत्र मिसळून पाने करपतात.

या भागातील पिके धोक्यात

तालुक्यातील अति पावसाच्या भागासह पूर्व भागातील पिंपळगावमोर, धामणी, शिरसाठे, कुशेगाव, धामणगाव साकूर, कवडदरा, घोटीखुर्द, निनावी, अडसरे, टाकेद, अधरवड, त्रिंगलवाडी, वासाळी, बारशिंगवे, सोनोशी मायदरा, खडकेद, खेड या भागात रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

नियंत्रणासाठी सल्ला

करपा रोगाचा प्रकार ओळखून (जिवाणू वा बुरशी) त्यानुसार कॉपर ऑक्सीक्लोराईड, स्ट्रेप्टोमीयसीन हा घटक असलेले प्रतिजैविक, प्रोपीकोनॅझोल, कार्बेन्डाझिम आदींचा वापर करण्यासाठी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या सल्ल्याची मदत घ्यावी. फवारणी द्रावणात स्टिकरचा वापर करावा. भात पिकाच्या योग्य वाढीकरिता व अधिक उत्पादनाकरिता भात खाचरात पाण्याची योग्य पातळी राखणे आवश्यक आहे, असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभागीय कृषी संशोधन केंद्र इगतपुरीचे वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. सुरेश परदेशी यांनी दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming: साठवलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी अडचणीत  

Farmer Cup: ‘फार्मर कप’द्वारे १५ हजार शेतकरी गट होणार: मुख्यमंत्री

Fenugreek Farming: मेथी पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढतोय कल

Rain Crop Damage: पाऊस सुरूच, उडीद पीक गेले हातचे

Pune APMC Corruption: पुणे बाजार समितीत २०० कोटींचा गैरव्यवहार: रोहित पवार

SCROLL FOR NEXT