Farmers Lowest Paid Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Lowest Paid: शेतमजुरांना सर्वाधिक मजुरी कोणत्या राज्यात मिळते ?

या दोन हंगामातील कामे संपल्यानंतर मजूर बांधकाम क्षेत्रावर रोजगारासाठी अवलंबून असतात. जिथे अगदीच किरकोळ मजुरी मिळते.

Team Agrowon

महागाईचा (Inflation) सर्वाधिक फटका शेती (Agriculture) आणि ग्रामीण भागाला (Rural Area) बसला आहे. यामध्ये शेती मंजुरांची अवस्था तर अधिक हालखीची असल्याचे आरबीआय (RBI) म्हणजे भारतीय रिजर्व बँकेच्या ताज्या आकडेवारीवरून दिसते.

आकडेवारीनुसार गुजरात, मध्यप्रदेश, करेळ आणि जम्मू काश्मीर या राज्यांमधील शेतमजुराला कमी तर काही ठिकाणी चांगली मजूरी दिली जाते.

भारतात प्रती दिवस मजुरी राष्ट्रीय पातळीवर सरासरी 323.2 रुपये इतकी आहे. मात्र मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये यापेक्षाही कमी मजुरी शेत मजुरांना दिली जाते. आरबीआयच्या आकडेवारीनुसार मध्यप्रदेश मध्ये शेतमजुराला प्रती दिवस 217.8 रुपये मिळतात. तर गुजरातमध्ये मार्च 2022 पर्यंत शेत मजुराला 220 रुपये प्रती दिवस याप्रमाणे मजुरी मिळायची.

देशातील उत्तरेचं राज्य असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये शेत मजुरांना 524.6 रुपये, हिमाचल प्रदेशमध्ये 457.6 रुपये तर तामीळनाडूमध्ये 445.6 रुपये प्रती दिवस मजुरी मिळते. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर मिळणारी मजुरी तुटपुंजी असल्याचे मजुरांनी सांगितले आहे.

-----------------------

केरळमध्ये सर्वाधिक मजुरी

आरबीआयच्या अहवालानुसार, केरळमध्ये शेतीत काम करणाऱ्या मजुरांना सर्वाधिक मजुरी मिळते. केरळमध्ये 25 दिवस शेतमजूर काम करतात. ज्यामधून 18702 रुपये महिना त्यांना मिळतो. 2021-2022 वर्षी केरळमध्ये मजुरांना 726.8 रुपये मजुरी मिळायची. त्यामुळे इतर राज्यातून केरळमध्ये मजुरीसाठी बहुतांश लोक स्थलांतर करतात. यातून 25 लाख स्थलांतरीत मजूर केरळमध्ये काम करत आहेत.

---------------

ग्रामीण भागातील रोजगारचे क्षेत्र

ग्रामीण भागातील जनता शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे सर्वाधिक मजूर शेती क्षेत्रावर अवलंबून आहेत. ग्रामीण भागात मॉन्सूनच्या दरम्यान रब्बी आणि खरीप हंगामात शेतीची कामे केली जातात. मात्र या दोन हंगामातील कामे संपल्यानंतर मजूर बांधकाम क्षेत्रावर रोजगारासाठी अवलंबून असतात. जिथे अगदीच किरकोळ मजुरी मिळते. आरबीआयच्या अहवालानुसार यंदाचे वर्ष शेती क्षेत्रातील मजुरांसाठी साधारण राहिले आहे.

Economic Survey: अल्प दिलासा की दीर्घ फायदा

Water Crisis: दिवे परिसरात पाणीटंचाई; अंजीर उत्पादक संकटात

Lonar Lake Water Level: लोणारच्या वाढत्या पाणीपातळीवर उपाय सांगा

Rabi Sowing: अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बी पेरणी ९६ टक्के

Long March: किसान सभेचा ‘लाँग मार्च’ स्थगित झाल्याने मोर्चेकरी परतले

SCROLL FOR NEXT