Moong Market Agrowon
ॲग्रो विशेष

Moong Market : नगरमध्ये मुगाचे दर आठ हजार रुपयांपर्यंत स्थिर

Moong Rate : बाजारात दररोज ४० क्विंटलपर्यंत आवक

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Nagar News : नगर : जिल्ह्यामध्ये मुगाच्या तोडणीला काही भागांत सुरुवात झाली आहे. सध्या बाजार समितीत मुगाची फारशी आवक होत नाही. मुगाला साधारण सात ते आठ हजार रुपयांपर्यंत दर स्थिर असल्याचे दिसून येत आहे. यंदा मुगाचे क्षेत्र बऱ्यापैकी असल्यामुळे बाजार समितीत पुढील पंधरा दिवसांत आवक वाढण्याची चिन्हे आहेत.

सध्या बाजारात दररोज ४० क्विंटलपर्यंत आवक होत असून, ७ हजार ते ८ हजार व सरासरी साडेसात हजार रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळत आहे. जिल्ह्यात खरिपात मुगाचे क्षेत्र बऱ्यापैकी असते. याशिवाय शेजारच्या छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांतूनही बाजार समितीत मुगाची आवक होत असते. या वर्षी पावसाळ्यात पावसाला लवकर सुरुवात झाल्यामुळे मुगाची पेरणी लवकर उरकले याशिवाय क्षेत्रातही वाढ झाली. मुगाची लवकर पेरणी झाल्यामुळे शेंगा तोडणीलाही काही भागांत सुरुवात झाली आहे.

अजून बाजारामध्ये मुगाची फारशी आवक होत नाही. बाजारात साधारण पंधरा दिवसांमध्ये मुगाची बऱ्यापैकी आवक सुरू होणार असल्याचे बाजार समितीतून सांगितले जात आहे. मात्र मुगाची बाजारात आवक सुरू झाल्यानंतर राहतील का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरवर्षीच्या तुलनेत यांना मुगाची अधिक प्रमाणात पेरणी झाली असल्यामुळे बाजारातही आवक वाढणार असल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.


राज्याच्या तुलनेत नगरमध्ये मुगाचे ३५ टक्के क्षेत्र
यंदा राज्यामध्ये दोन लाख ३४ हजार ४४२ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी आतापर्यंत एक लाख ७४ हजार ४५४ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली होती. यावर्षी साधारणपणे जिल्ह्यामध्ये ५२ हजार हेक्टरवर मुगाची पेरणी झाली आहे. राज्यातील पेरणी क्षेत्राचा विचार करता एकट्या नगर जिल्ह्यामध्ये सुमारे ३५ टक्के मुगाचे क्षेत्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra River Rejuvenation: अखेर नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

POCRA Research Agreement: ‘पोकरा’अंतर्गत संवर्धित शेतीसाठी संशोधन करार

Supe Water Supply Scheme: डोक्यावरील हंडा उतरणार !

Revenue Officer Corruption: उपळाईचा मंडल अधिकारी लाच घेताना अटकेत

Rural Development: लोकाभिमुख होऊन गावांची विकासकामे करा: ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे

SCROLL FOR NEXT