Election Agrowon
ॲग्रो विशेष

Vidhansabha Election : सोलापुरात साखर कारखानदारांचा ‘गोतावळा’ निवडणूक आखाड्यात

Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत ११ मतदार संघांत निवडणूक होत आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांचे अध्यक्ष प्रत्यक्ष निवडणुकीत उतरले आहेत.

सुदर्शन सुतार

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत ११ मतदार संघांत निवडणूक होत आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांचे अध्यक्ष प्रत्यक्ष निवडणुकीत उतरले आहेत. त्याशिवाय काहींच्या कुटुंबातील व्यक्ती व नातेवाईक असा गोतावळाही या आखाड्यात उतरला आहे. त्यामुळे यापैकी कोणाला शेतकरी आपली पसंती देतात, हा विषय औत्सुक्याचा ठरला आहे.

साखर कारखानदारांभोवतीच जिल्ह्याचे राजकारण फिरते. काँग्रेस, भाजप, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच पक्षांतील नेत्यांकडे साखर कारखाने आहेत. यंदाच्या निवडणुकीत बहुतेक साखर कारखानदार विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत.

सोलापूर दक्षिण मतदार संघातून लोकमंगलचे संस्थापक, भाजपचे नेते, माजी मंत्री सुभाष देशमुख आणि अपक्ष उमेदवार म्हणून सिद्धेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी उभे आहेत.

अक्कलकोटला मातोश्री शुगरचे अध्यक्ष, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माढ्यातून विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, तर त्यांच्याविरोधात आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव आणि इंण्डेन शुगरचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे लढत आहेत, पंढरपुरात ‘आवताडे शुगर्स’चे विद्यमान आमदार समाधान आवताडे, ‘भैरवनाथ शुगर्स’चे उपाध्यक्ष अनिल सावंत समोरासमोर आहेत.

करमाळ्यातून विद्यमान आमदार आणि ‘विठ्ठल शुगर्स’चे अध्यक्ष संजयमामा शिंदे आणि मकाईचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आव्हान दिले आहे. त्याशिवाय विठ्ठलराव शिदे कारखान्याचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार बबनराव शिंदे हे आपल्या चिरंजीवासाठी तर पांडुरंग कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार प्रशांत परिचारक, ‘सिद्धनाथ’चे अध्यक्ष, माजी आमदार दिलीप माने, ‘लोकनेते’चे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार राजन पाटील हे कारखानदार नेते प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT