Vidhansabha Election 2024 : अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभेच्या लढती निश्चित

Maharashtra Assembly Election : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघांतील निवडणुकीच्या लढती निश्चित झाल्या आहेत.
Vidhansabha Election 2024
Vidhansabha Election 2024Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघांतील निवडणुकीच्या लढती निश्चित झाल्या आहेत. मात्र मागणी करूनही उमेदवारी मिळाली नाही त्या नेत्यांनी बंडखोरीची भाषा करत उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे लढती निश्चित झाल्या असल्या तरी बंडखोरी रोखण्याचे मोठे अव्हान पक्षांसमोर आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या उमेदववारांतच लढत होणार असल्याचे दिसत आहे. अहिल्यानगर शहर मतदार संघात महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) संग्राम जगताप तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरदचंद्र पवार गट) अभिषेक कळमकर, श्रीगोंद्यात भाजपकडून आमदार बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते तर शिवसेनेकडून (उबाठा गट) जिल्हा बॅंकेच्या संचालिका अनुराधा नागवडे,

Vidhansabha Election 2024
Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीमुळे राज्याच्या महसुलात भर; फक्त उमेदवारांच्या अर्जातून ५५ लाख जमा

शेवगाव-पाथर्डीमध्ये भाजपकडून आमदार मोनिका राजळे व राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार गट) प्रताप ढाकणे, राहुरी-नगरमध्ये भाजपकडून जिल्हा बॅंकचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार गट), शिर्डीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी आमदार चंद्रभान घोगरे पाटील यांच्या सून कृषिभूषण प्रभावती घोगरे काँग्रेसकडून, कोपरगावला राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) आमदार आशुतोष काळे तर राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार गट) संदीप वर्पे,

पारनेरला राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार गट) खासदार नीलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके व राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती काशीनाथ दाते, कर्जत-जामखेडला राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार व भाजपकडून माजी पालकमंत्री राम शिंदे, अकोल्यात राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) आमदार किरण लहामटे व राष्ट्रवादीकडून (शरदचंद्र पवार गट) युवा नेते अमित भांगरे यांच्यात लढत निश्चित झाली आहे.

Vidhansabha Election 2024
Maharashtra Assembly Election 2024 : भावी आमदारांचे भवितव्य नवमतदारांच्या हाती; १८ ते १९ वयोगटातील २२ लाख मतदार

संगमनेरला काँग्रेसचे बाळासाहेब थोरात व शिवसेनेकडून (शिंदे गट) अमोल खताळ, श्रीरामपूरला काँग्रेसकडून हेमंत ओगले आणि शिंदेसेनेकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, नेवाशात माजीमंत्री शंकरराव गडाख यांना शिवसेनेकडून (उबाठा गट) तर भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बच्चू कडू यांच्या जनशक्ती प्रहार पक्षाकडून उमेदवारी दाखल केली आहे.

या वेळी बंडखोरी अधिक होण्याची शक्यता आहे. कोपरगावचे युवा नेते विवेक कोल्हे यांची समजूत घालण्यात भाजप नेत्यांना यश आले असले तरी श्रीरामपूरला उमेदवारी नाकारल्याने काँग्रेसचे माजी आमदार लहू कानडे यांनी राष्ट्रवादीकडून, श्रीगोंद्याला माजी आमदार राहुल जगताप, सुवर्णा पाचपुते, घनशाम शेलार, अण्णा शेलार, शेवगाव-पाथर्डीत माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे,

भाजप नेते गोकुळ दौंड, अकोल्यात माजी आमदार वैभव पिचड, पारनरेला शिवसेना (उबाठा गट) नेते संदेश कार्ले, अहिल्यानगर शहरातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, माजी महापौर संदीप कोतकर यांच्या पत्नी व माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर अशी वजनदार मंडळी उमेदवारी मिळाली नसल्याने अपक्ष लढण्याची भाषा करत अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे लढती निश्चित झाल्या असल्या तरी बंडखोरी थोपवण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर असणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांची भूमिका

अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच मतदार संघांत मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण लढा जोरात सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मराठा, मुस्लिमांसह अन्य समाजांतील कार्यकर्ते या लढ्यात जोडलेले आहेत. लोकसभेला मराठा आरक्षण लढ्याचा प्रभाव दिसला, प्रश्न सुटलेला नसल्याने विधानसभेलाही हा प्रभाव कायम आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्यासह बहुतांश नेते जरांगे पाटील यांना भेटून आले आहेत. या निवडणुकीत जरांगे पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची राहणार आहे. त्यामुळे त्यांची भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com