Water Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Water Update : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, जमिनीची पाणीपातळी देखील जानेवारीच्या तुलनेत सध्या एक मीटरने खालावली आहे.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, जमिनीची पाणीपातळी देखील जानेवारीच्या तुलनेत सध्या एक मीटरने खालावली आहे. गावागावातील हातपंप आता बंद पडू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात टॅंकरची मागणी वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील अकराशे गावांपैकी १०२ गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रताही वाढली आहे. जिल्ह्याचे सरासरी तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे आहे. या दोन दिवसांत तर ते ४२ आणि ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. जिल्ह्यातील माळशिरस, करमाळा, सांगोला या तालुक्यांमध्ये सर्वाधिक टॅंकर सुरू आहेत. दुसरीकडे जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणातील पाणीपातळी सध्या उणे ४२ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

त्याशिवाय नदी, ओढे, लघु-मध्यम प्रकल्पांनी या आधीच तळ गाठला आहे. बहुतेक प्रकल्प कोरडे आहेत. बोअर आणि विहिरींची पाणीपातळीही खोलवर गेली आहे. अनेकांच्या विहिरींचे पाणी बंद झाले आहे, अशा परिस्थितीत टॅंकरची मागणी वाढू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील गावागावांमधील पाणी टंचाईची तीव्रता भीषण होत आहे. नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. गावागावांत दोन दिवसाआड होणारा पाणीपुरवठा आता तीन दिवसाआड झाला आहे.

दरम्यान, अनेक गावांनी टॅंकरची मागणी केली आहे, पण तत्पूर्वी त्यासंदर्भातील निकषांची काटेकोरपणे पडताळणी करूनच त्या गावांना टॅंकर दिला जात आहे. टॅंकर देण्याचे अधिकार सध्या प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मेअखेर जिल्ह्यातील टॅंकरची संख्या एक हजारांवर जाईल, अशी सद्य:स्थिती आहे.

‘या’ गावांना होतोय टॅंकरने पाणीपुरवठा

माळशिरस : भांब, पिंपरी, गारवाड, मगरवाडी, फडतरी, फडतरी (शिवारवस्ती व निटवेवाडी), कोथळे, बचेरी, माणकी, लोणंद, लोंढे मोहितेवाडी, सुळेवाडी, जळभावी, शिंगोर्णी, उंबरे दहिगाव, रेडे, गीरवी.

माढा : तुळशी, बावी, कुर्डू, शिराळ मा., परितेवाडी, वैरागवाडी, भोसरे.

करमाळा : घोटी, साडे आळसुंदे, फिसरे, सालसे, निबोरे, रायगाव, देलवडी, वरकुटे, पाथुर्डी, अंजनडोह, नेर्ले, तरटगाव, पाडळी, वीट, पांडे, धायखिंडी, मलवडी, केम, गौंडरे, श्री देवीचा माळ, सावडी, शेलगाव (क), बिटरगाव (श्री), कोर्टी, कुंभारगाव, पोंधवडी, पोथरे, वरकटणे.

मंगळवेढा : येड्राव, गणेशवाडी, भाळवणी, आंधळगाव, लक्ष्मीदहिवडी, सलगर खु., बावची, शिरनांदगी, शिवणगी, निंबोणी.

दक्षिण सोलापूर : कुंभारी, बंकलगी, दोड्डी, यत्नाळ, कणबस.

सांगोला : सोनलवाडी, बागलवाडी, लक्ष्मीनगर, कटफळ, अचकदानी, चिकमहुद, डोंगरगाव, य. मंगेवाडी, अजनाळे, लोटेवाडी, वासुद, ईटकी, पारे, महुद बु., चिनके, वाकी शिवणे, शिवणे, खवासपूर, सोमेवाडी, घेरडी, एखतपूर, मांजरी, कमलापूर, वाढेगाव, आगलावेवाडी.

बार्शी : धोत्रे, पिंपळगाव धस, गुळपोळी, कुसळंब, टोणेवाडी.

अक्कलकोट : सुलेरजवळगे

मोहोळ : शेटफळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT