Water Scarcity : भूजल पातळीत घट; ३४ गावांत हातपंप बंद

Water Crisis : जिल्ह्यात वर्षात पाणीपातळी खोल गेल्याने ३४ गावांतील सार्वजनिक हातपंप बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Water Crisis
Water CrisisAgrowon
Published on
Updated on

Akola News : असमतोल पाऊसमान, वाढते तापमान यामुळे भूजल पातळीत सातत्याने घट येत आहे. जिल्ह्यात वर्षात पाणीपातळी खोल गेल्याने ३४ गावांतील सार्वजनिक हातपंप बंद झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यात ग्रामीण भागात चार हजार ९३८ हापपंप आहेत. त्यापैकी ३४ गावातील पंप नादुरुस्त आहेत. भूजल पातळीत घट झाल्याने हे हातपंप बंद असल्याची माहिती आहे. या गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे.

Water Crisis
Water Scarcity : ‘हर घर नल से’ नाही, तर टँकरमधूनच पाणी

उन्हाळ्यात ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने प्रत्येक वर्षी पाणी टंचाई निवारण कृती आराखडा तयार करण्यात येतो. त्याअंतर्गत यावर्षी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने जानेवारी ते मार्च आणि एप्रिल ते जून या कालावधीसाठी संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला.

या आराखड्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. आराखड्यात मंजुरी प्राप्त उपाययोजनांपैकी जिल्हाधिकारी कुंभार यांनी काही उपाययोजनांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे काही गावात पाणी टंचाई निवारणाची कामेसुद्धा झाली आहेत. परंतु काही गावात भूजल पातळी घटल्याने हातपंप बंद पडल्याचे दिसून येत आहे.

Water Crisis
Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

तालुकानिहाय तात्पुरते

बंद असलेले हातपंप

तालुका हातपंप संख्या

अकोट ०२

बाळापूर ०५

तेल्हारा ०३

अकोला ०६

मूर्तीजापूर ०८

पातूर ०५

बार्शीटाकळी ०५

मंजूर आराखडा

जिल्ह्यात एकूण २३८ गावांमध्ये पाणीटंचाई सदृश स्थिती व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित गावांसाठी १०१ विंधन विहिरी, ४ नळ योजनांची विशेष दुरुस्ती, २३० प्रगतिपथावरील नळयोजना पूर्ण करणे, ३ टँकररद्वारे पाणीपुरवठा, १११ खासगी विहिरींचे अधिग्रहण अशा एकूण ५५० उपाययोजनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी चार कोटी ५० लाख ९७ हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com