Sangli News : सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला असला, तरी वारणा आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सांगली येथील आयर्विन पुलाजवळ शनिवारी (ता. २७) सकाळी ४० फूट इतकी पाणीपातळी आहे. कृष्णा नदीने इशारा पातळी गाठली आहे. वारणा धरण पाणलोट क्षेत्र वगळता इतर भागात पावसाचा जोर कमी झाला असला तरी सांगलीत पुराची धास्ती कायम आहे.
जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाचा जोर कमी झाली आहे. तर वारणा आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. वारणा धरणातून शुक्रवार (ता. २६) १५७८५ इतका पाण्याचा विसर्ग सुरू होता.
वारणा धरणातून शनिवारी (ता. २७) ६०० क्युसेकने विसर्ग वाढवला असून सध्या १६३८५ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. वारणा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत ७३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. आयर्विन पुलाजवळ इशारा पातळी ४० फूट तर धोका पातळी ४५ फूट आहे. सध्या कृष्णा नदीची पाणीपातळी इशारा पातळी गाठली आहे.
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय धरण प्रशासनाने घेतला होता. मात्र, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा काहीसा जोर कमी झाल्याने विसर्ग वाढवण्याचा तात्पुरता स्थगित करत तो ३२ हजार १०० क्युसेकवर स्थिर केला.
परंतु कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे पुराची धास्ती कायम असल्याने महापुरात मदतीसाठी लष्कराची १०७ जणांची तुकडी शुक्रवारी (ता. २६) रात्री सांगलीत दाखल झाली. त्यात ३ वरिष्ठ अधिकारी, १० अधिकारी यांचा समावेश आहे. बोटी आहेत. जवानांच्या निवासाची व्यवस्था सैनिक कल्याण बोर्डात करण्यात आली आहे. शनिवारी (ता. २७) सैनिक कृष्णाकाठी दाखल झाले आहेत.
सांगली शहरात १७३ कुटुंबांचे स्थलांतर
पुरबाधित तालुक्यातील १८ गावातील ४९७ कुटुंबातील २ हजार ३५ नागरिकांचे स्थलांतर
२ हजार ७८२ पशुधनाचेही सुरक्षितस्थळी स्थलांतर
कृष्णा, वारणेची पातळीत हळूहळू वाढतेय
मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील पिके पाण्याखाली
वारणा, कृष्णा नद्यांना आलेल्या पाण्यामुळे एसटीच्या १५१ फेऱ्या रद्द
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.