Water Level Agrowon
ॲग्रो विशेष

Water Storage : सांगली जिल्ह्यात प्रकल्पांमध्ये १० टक्के पाणीसाठा वाढला

Water Level Update : डिसेंबरपेक्षा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठ्यात १० टक्क्यांनी म्हणजे २९९ दशलक्ष घनफुटांनी वाढ झाली असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.

Team Agrowon

Sangli News : म्हैसाळ, ताकारी सिंचन योजना सुरू आहे. या सिंचन योजनांच्या लाभ क्षेत्रातील तलावांत पाणी सोडले आहे. त्यामुळे डिसेंबरपेक्षा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठ्यात १० टक्क्यांनी म्हणजे २९९ दशलक्ष घनफुटांनी वाढ झाली असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे.

जिल्ह्यातील ८३ मध्यम व लघू प्रकल्पांत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात २५३८ दशलक्ष घनफूट म्हणजे ३३ टक्के पाणीसाठा आहे. डिसेंबरमध्ये तो २३ टक्के होता. जिल्ह्यात मध्यम ५ तर लघू ७८ अशी प्रकल्पांची एकूण ८३ संख्या आहे. त्यांची पाणी साठवणक्षमता ९४४०.२० दशलक्ष घनफूट आहे. जिल्ह्यात यंदा पावसाने सरासरीही गाठली नाही. त्यामुळे प्रकल्पांतील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. परिणामी शेतीसह पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे.

दरम्यान, म्हैसाळ, ताकारी, आरफळ या उपसा सिंचन योजनांचे रब्बी हंगामासाठी आवर्तन सुरू आहे. पाटबंधारे विभागाने या लाभ क्षेत्रातील तलाव भरून देण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार या लाभ क्षेत्रातील तलावांत पाणी सोडले आहे. आटपाडी, तासगाव, खानापूर, कडेगाव, जत, कवठेमहांकाळ या दुष्काळी पट्ट्यातील तलावात पाणी सोडले आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.

तालुकानिहाय तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)

तालुका प्रकल्पांची संख्या उपयुक्त पाणीसाठा टक्के

तासगाव ७ १५१.१७ २७

खानापूर ८ २३३.५९ २३

कडेगाव ७ ४०७.३८ ४५

शिराळा ५ ५२८.५३ ६०

आटपाडी १३ ६९२.५५ ६०

जत २७ ५३६.०२ १८

कवठेमहांकाळ ११ १६२.७५ २०

मिरज ३ ३७.८५ ३१

एकूण ८३ २५३७.७१ ३२

१६ तलाव कोरडे

डिसेंबरमध्ये ३१ प्रकल्प कोरडे होते. बहुतांश प्रकल्प हे जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या दुष्काळी तालुक्यातील होते. मात्र सिंचन योजनांचे आवर्तन सुरू असल्याने १५ तलावांत पाणीसाठा झाला आहे. मात्र अजूनही १६ तलाव कोरडे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT