Soybean Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Issue : नांदेडला पक्वतेपूर्वीच सोयाबीन झाले पिवळे

Climate Change Issue : नांदेड जिल्ह्यात यंदा ऑगस्टमधील सततच्या पाऊस आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. यासोबतच तापमानात झालेल्या बदलामुळे सोयाबीन पीक पक्वतेपूर्वीच पिवळे पडून पाने गळून पडत आहेत.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात यंदा ऑगस्टमधील सततच्या पाऊस आणि सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी झाली. यासोबतच तापमानात झालेल्या बदलामुळे सोयाबीन पीक पक्वतेपूर्वीच पिवळे पडून पाने गळून पडत आहेत. हा प्रकार जिल्ह्याच्या सर्वच भागात दिसून येत आहे. मागीलवर्षी याच प्रकारे सोयाबीनचे नुकसान झाले होते. सलगच्या संकटामुळे शेतकरी मात्र पुरते धास्तावले आहेत.

नांदेड जिल्ह्यात सर्वाधीक साडेचार लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. जिल्ह्यातील खरिपामध्ये घेतले जाणारे महत्त्वाचे पीक सोयाबीन असल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण या पिकाच्या उत्पादकतेत भोवती केंद्रित असते. या पिकावर मागील काही वर्षापासून कीड व रोगांचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होत आहे.

परंतु यंदा या पिकावर अतिवृष्टीचे आरिष्ट ओढवले आहे. जिल्ह्यात जून व जुले मध्ये फारसा पाऊस झाला नाही. परंतु ऑगस्टमध्ये सतत पाऊस होता. यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या दिवसापासून सलग तीन पावसाने कहर केला. या काळात झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे जिल्ह्यातील तब्बल ७५ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली.

या पावसामुळे शेतात पाणी साचून पिके पिवळी पडू लागली. काही वर्षापासून या पिकावर पिवळ्या मोझॅक रोगाने आक्रमण केले आहे. काही ठिकाणी बुरशीमुळे कुजल्याने पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. सध्या नांदेड जिल्ह्यातील उभ्या असलेल्या सोयाबीनवर या प्रकारचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

परिणामी पक्वतेपूर्वीच सोयाबीन पिवळे पडून शेतात उभी असलेली पिके नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यांतील जवळपास सर्वच भागात किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोयाबीनवर एकामागून एक संकट येत आहे. सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च केले. मात्र अतिवृष्टीमुळे आलेल्या रोगराईमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT