Soybean Yellow Mosaic : परभणी, हिंगोलीत सोयाबीनवर ‘पिवळ्या मोझॅक’चा प्रादुर्भाव

Soybean Disease Control : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीनवर यलो मोझॅक व्हायरस या विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे.
Soybean Yellow Mosaic
Soybean Yellow MosaicAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीनवर यलो मोझॅक व्हायरस या विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. यामुळे सोयाबीनच्या उत्पादकतेत १५ ते ७५ टक्के घट येऊ शकते.

नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी सांगितले.

यंदा परभणी जिल्ह्यात २ लाख ६५ हजार २४४ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यात २ लाख ४९ हजार ५४९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. या दोन जिल्ह्यातील सर्वच भागातील सोयाबीन पिकांवर थोड्या प्रमाणात यलो मोझॅक व्हायरस रोगाचा प्रार्द्रुभाव आढळून येत आहे. कडधान्ये तसेच तणे ही या रोगाची पर्यायी यजमान पिके आहेत. यंदाच्या हंगामाच्या सुरवातीलाच बऱ्याच भागात प्रादुर्भाव सुरू झाल्याचे दिसून आले.

Soybean Yellow Mosaic
Soybean Yellow Mosaic : सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’चा प्रादुर्भाव

पीक लहान अवस्थेत असताना प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. कालांतराने फुले व शेंगा कमी लागतात. दाण्यांचा आकार लहान राहतो. संपूर्ण शेंगा दाणे विरहित राहून पोचट होतात. परिणामी उत्पादकतेत १५ ते ७५ टक्के पर्यंत घट येऊ शकते. या रोगाचा प्रसार पांढऱ्या माशीद्वारे होतो.

Soybean Yellow Mosaic
Soybean Yellow Mosaic Disease : सोयाबीनवर यलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी हतबल

त्यामुळे पिकाचे निरीक्षण आणि सर्वेक्षण करावे. वेळीच या रोगाची लक्षणे ओळखावीत. प्रादुर्भावग्रस्त पाने, झाडे दिसून येताच ती वेळोवेळी समूळ काढून नष्ट करावीत. त्यामुळे निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल. पांढऱ्या माशीचे नियंत्रण करुन या रोगाचे व्यवस्थापन करावे. शास्त्रज्ञांचा सल्ला घ्यावा.

गेल्या वर्षी (२०२२) मराठवाड्यातील अनेक भागात सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना तर संपूर्ण पीकच उपटून टाकावे लागले होते. प्रादुर्भाव टाळण्यासाठी बिगर हंगामी सोयाबीनची लागवड शक्यतो टाळावी. त्यामुळे किडीच्या जीवनक्रमात खंड पडतो. पुढील हंगामात किडींचा प्रादुर्भाव कमी राहतो, असे डॉ. पटाईत यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com