Soybean Farming : सोयाबीनचे मोठे क्षेत्र ठरतेय वांझोटे

Soybean Production : यंदा सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेल्या सोयाबीन पिकात काही ठिकाणी शेंगा लागलेल्या नसल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारींचा सूर उमटत आहे. शेतकरी शेंगा नसलेली झाडे घेऊन प्रशासनाकडे जात आहेत.
Soybean Farming
Soybean FarmingAgrowon
Published on
Updated on

Akola News : यंदा सर्वाधिक लागवड क्षेत्र असलेल्या सोयाबीन पिकात काही ठिकाणी शेंगा लागलेल्या नसल्याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारींचा सूर उमटत आहे. शेतकरी शेंगा नसलेली झाडे घेऊन प्रशासनाकडे जात आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सातत्याने प्रश्‍न विचारत आहेत. या प्रकारामुळे यंदा सोयाबीन उत्पादकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झेलावे लागणार आहे.

राज्यात यंदा सरासरी ४० लाख हेक्टरच्या तुलनेत सुमारे ५१ लाख २७ हजार हेक्टरपर्यंत लागवड पोहोचली. मात्र, सोयाबीन उत्पादक पट्ट्यात यंदा संतत पाऊस झाला. पीक फुलोरावस्थेत असताना हे प्रमाण अधिक होते. पावसामुळे सोयाबीनचे व्यवस्थापनही वेळेवर करणे शक्य झाले नाही. काही शेतकऱ्यांनी व्यवस्थापन करूनही त्यांच्या शेतातील पिकाला शेंगा, फुलोरा नसल्याच्या तक्रारीही होत आहेत. एकूणच वातावरणाचा सर्वाधिक फटका यावर्षी सोयाबीन पिकाला बसतो आहे. सोयाबीनची एकरी उत्पादकता या भागात ६ ते ९ क्विंटल राहते. यावर्षी एवढे उत्पादन येण्याची शक्यता बरीच कमी आहे.

Soybean Farming
Cotton Soybean Madat : कापूस, सोयाबीन योजनेच्या अर्थसाह्याबाबत दिलासा

तज्ज्ञांच्या मते कारणे

या प्रकाराबाबत कृषी तज्ज्ञांनी मांडलेल्या मतांनुसार, सोयाबीन पेरणी दाट झालेली असेल, त्यामुळे सूर्यप्रकाश पुरेसा मिळाला नाही. यावर्षी सोयाबीनची वाढ ही जास्त झाली असून त्यामुळे शेंगा लागण्यावर त्याचा परिणाम झाला. सततच्या पावसामुळे फूलगळ झालेली असावी. ढगाळ वातावरणामुळे आणि वातावरणातील बदलामुळे वाढ जास्त झाली व फुले लागली नाहीत किंवा गळ झाली असावी.

फुलोरावस्थेत ढगाळ वातावरण तसेच धुके पडले तर त्यामुळे फूलगळ होते व शेंगागळ सुद्धा होते. महत्त्वाचे म्हणजे फूल वाढीची अवस्था असताना अळीचा (शेंगा खाणारी/पाने खाणारी/ लष्करी) प्रादुर्भाव झाला तर कोवळी शेंग अळी खाते. मोठ्या प्रमाणावर नेमका फुलोरा आणि शेंगा लागण्याच्या अवस्थेत जर असा प्रादुर्भाव झाला असेल आणि फवारणी केली नसेल तर असे होऊ शकते.

Soybean Farming
Soybean Procurement Process : मध्य प्रदेशामध्ये एमएसपीवर सोयाबीन खरेदीसाठी २५ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू

याचवेळी लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला होता. त्यावेळी जे प्लॉट फूल-शेंगा अवस्थेत होते आणि अशा वेळी फवारणी करणे शक्य झाले नसेल तर अशा ठिकाणी ही परिस्थिती जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी सारखा पाऊस होता. त्यामुळे अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे अपेक्षित होते. ते झालेले दिसत नाही आणि त्याचा परिणाम शेंगा लागण्यावर झाला आहे.

यंदाची सोयाबीन लागवड

राज्यात ५१ साथ २७ हजार ४९० हेक्टर

पश्‍चिम विदर्भात १५ लाख १३३१५ हेक्टर

अकोला जिल्हा २ लाख ३७२२७ हेक्टर

बुलडाणा ४ लाख ४०,५१५ हेक्टर

वाशीम २ लाख ९९,२२१ हेक्टर

मी यंदा ८ एकरात सोयाबीनचा फुले संगम वाण पेरला आहे. या क्षेत्रातील सोयाबीनच्या झाडांवर एकही शेंग नाही. गावशिवारात ८० टक्के शेतकऱ्यांच्या शेतात अशाच प्रकारे शेंग, फूलधारणा झालेली नसल्याचे दिसून येत आहे. या पिकाला तीन फवारण्या, एक तणनाशक, खते, डवरणी अशी मशागत केली. मागील पाच सहा वर्षांपासून कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत नुकसान होत आहे. कृषी विभागाने तातडीने पाहणी करून मार्गदर्शन व मदत करावी.
गजानन भारसाकळे, शिवापूर, ता. जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com