Agriculture Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Sowing : नागपूर जिल्ह्यात एक टक्का क्षेत्रावरच पेरणी

Kharif Season : नागपूर जिल्ह्यात कृषी विभागाने यंदा खरीप हंगामासाठी ४ लाख ७९ हजार ८१० हेक्टरवरील क्षेत्रात पेरणीचे नियोजन केले आहे.

Team Agrowon

Nagpur News : नागपूर जिल्ह्यात कृषी विभागाने यंदा खरीप हंगामासाठी ४ लाख ७९ हजार ८१० हेक्टरवरील क्षेत्रात पेरणीचे नियोजन केले आहे. यंदा निम्मा जून लोटूनही अद्याप पेरणी योग्य पाऊस झाला नाही. परंतु काही शेतकऱ्यांकडून पेरणीला सुरवात करण्यात आली असून हे क्षेत्र नियोजित क्षेत्राच्या ०.८६ टक्के इतकी आहे.

खरीप हंगाम हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या हंगामामध्ये ओलिताची सोय नसलेल्यांसह सर्वच शेतकरी हे मॉन्सूनच्या पावसाच्या भरवशावर पीक घेत असतात. अशातच या हंगामासाठी कृषी विभागाने गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १५ हजारांहून अधिक क्षेत्राचे नियोजन केले आहे.

यंदा खरिपासाठी विभागाने ४ लाख ७९ हजार ८१० हेक्टरवरचे नियोजन केले आहे. पावसाने राज्यातील काही भागात हजेरी लावली आहे. परंतु नागपूर जिल्ह्यात अद्यापही पेरणी योग्य पाऊस झाला नाही. सरासरी जूनमध्ये जिल्ह्यात शंभर मि.मी.वरच पाऊस होत असतो. परंतु यंदा तोही आकडा गाठला नसल्याची परिस्थिती आहे.

त्यामुळे शेतकरीही पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. अशात काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीही उरकवून टाकल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे जर पाऊस लांबल्यास त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढविण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजवर जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या कापसाची नियोजित क्षेत्राच्या ३३९६ हेक्टर, भाताची ५.९ हेक्टर, तुरीची ३० हेक्टर व सोयाबीनची ५७७ हेक्टर अशी एकूण नियोजित क्षेत्राच्या ०.८६ टक्के पेरणी झाली आहे.

पीक नियोजित क्षेत्र

भात ९५०००

मका ४०००

कापूस २२५०००

सोयाबीन ९००००

तूर ६१०००

ज्वारी १०००

मुग ३००

उडीद ३००

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Cabinet Decision: महाराष्ट्र वैरण विकास धोरण जाहीर; पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न मिटणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Load Shedding : सततच्या वीजभारनियमनामुळे पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत

Water Releases Plan: दूधगंगा, वारणेकाठी शेतीसाठी आवर्तने

Agriculture Irrigation Crisis: वीजपुरवठ्याचे नियोजन कोलमडले; सिंचनाची कोंडी

MSRTC Electric Buses: एसटी महामंडळाचा निर्णय; जुन्या डिझेल बसेसचे टप्प्याटप्प्याने ई-बसमध्ये रूपांतर

SCROLL FOR NEXT