Power Supply Issue: पावसाने दडी मारल्याने खरिपातील पिकांसह ऊस, द्राक्ष आणि डाळिंब बागांना संरक्षित सिंचनाची गरज निर्माण झाली आहे. कृष्णा-वारणा काठच्या भागात पाणी उपलब्ध असले, तरी ते पिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेली वीजच गायब होत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.