Agriculture Sowing : पावसाच्या आगमनाने पेरणीला वेग

Agriculture Update : पालघर जिल्ह्यातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबे ही शेतीवर अवलंबून आहेत. पावसाने बुधवारी (ता. १९) सकाळपासून सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Agriculture Sowing
Agriculture SowingAgrowon

Palghar News : पालघर जिल्ह्यातील ७० टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबे ही शेतीवर अवलंबून आहेत. पावसाने बुधवारी (ता. १९) सकाळपासून सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. डहाणू, तलासरी तसेच पालघर तालुक्याचा काही भागांमध्ये पेरणीलायक पाऊस झाला आहे.

मात्र, जव्हार, मोखाडा या भागांमध्ये पाऊस झालेला नाही. पावसाने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत, असे शेतकरी संजय पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील वातावरण पोषक असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीस विलंब लावू नये; अन्यथा पुढील शेतीच्या कामांना उशीर होईल, असे डहाणूचे प्रभारी तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटील यांनी सांगितले.

Agriculture Sowing
Agriculture Sowing : बीड जिल्ह्यात जवळपास निम्मी पेरणी उरकली

गेल्या आठवड्यात पावसाने मेघगर्जनेसह दमदार हजेरी लावली होती. पाऊस सातत्याने आणि नित्यनेमाने सुरू राहील, या आशेने काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती; परंतु चित्र उलटे झाले. काही दिवसांत शेतकऱ्यांच्या दृष्टीने अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे पेरणी करावी, की करू नये? या चिंतेने शेतकरी त्रस्त झाले होते. अशा परिस्थितीत मंगळवारी (ता. १८) आणि बुधवारी (ता. १९) सकाळपासून जिल्ह्यात पावसाने सुरुवात केल्यामुळे पेरणीच्या कामांना वेग येणार आहे, असे शेतकरी संजय पाटील यांनी सांगितले.

Agriculture Sowing
Agriculture Sowing : नाशिक जिल्ह्यात अवघ्या ६ टक्के खरीप पेरण्या

दुबार पेरणीचे संकट टळले

वाढलेल्या बियाण्यांच्या किमती, औषधे, खते, बी-बियाणे यांचे वाढलेले दर, मजूर खर्च, दुबार बी-बियाणे खरेदी करण्यासाठी जाणवणारा तुटवडा या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार की काय? अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीला मेघराज धावून आले आणि बरसले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा जिवंत राहिल्या आहेत.

निसर्गामधील बदल, पावसाचे अनिश्चिततेचे स्वरूप, निविष्ठांचे वाढलेले दर, जून महिन्याचे १५ दिवस संपले तरीही पावसाचा थांगपत्ता नाही, अशा परिस्थितीत शेतीवर उपजीविका करणे आर्थिकदृष्ट्या परवडनासे झाले आहे. पाऊस नित्यनेमाने सुरू राहील, या भावनेने पेरणी केली; परंतु मधल्या काळात पावसाने माघार घेतल्याने पेरलेले बियाणे उगवेल की नाही?, अशी शंका होती. अशा परिस्थितीत मंगळवारपासून मेघराज आमच्यासाठी धावून आला आहे.
संजय पाटील, शेतकरी, डहाणू

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com