Rain Update agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : जोर कमी पण हजेरी कायम; हिंगोलीतील तीन मंडळात अतिवृष्टी

Rain in marathwada : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात रविवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासाच्या तुलनेत सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासात पावसाचा जोर कमी होता.

Team Agrowon

Chhatrapati sambhaji nagar News : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात रविवारी (ता. २३) सकाळपर्यंतच्या २४ तासाच्या तुलनेत सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या चोवीस तासात पावसाचा जोर कमी होता. परंतु अपवाद वगळता पावसाची हजेरी कायम होती. अनेक मंडळात पावसाने उसंत दिल्याचे पाहायला मिळाले. हिंगोली जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. हिंगोली जिल्ह्यातील तीन मंडळात अतिवृष्टी झाली.

जालना जिल्ह्यातील सत्र मंडळात १० ते ५८ मिलीमीटर दरम्यान पाऊस इतर मंडळात पावसाची तुरळक हलकी हजेरी होती. हिंगोली जिल्ह्यातील तीन मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामध्ये हिंगोली ९९.३ मिलिमीटर, दिग्रस ७१.८ मिलिमीटर तर येहळेगाव मंडळात झालेल्या ७१.८ मिलिमीटर पावसाचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील उर्वरित २७ मंडळात दहा ते ६३ मिलिमीटर दरम्यान पाऊस हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाचा जोर फार कमी होता. जिल्ह्यातील दहा मंडळात १० ते २२ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला इतर मंडळात पावसाची हजेरी तुरळक हलकीच होती. अनेक मंडळात तर पावसाने उसंत दिल्याचे पाहायला मिळाले.

बीड जिल्ह्यात ३६ मंडळात १० ते ५१ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. उर्वरित मंडळात पावसाची हजेरी तुरळक हलक्या स्वरूपाची होती. लातूर जिल्ह्यातील २८ मंडळात दहा ते ४४ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला उर्वरित मंडळात पावसाची हजेरी तुरळक हलक्या स्वरूपाची होती. धाराशिव जिल्ह्यातील ३९ मंडळात तुरळक हलका पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील ४४ मंडळात दहा ते ५७ मिलिमीटर दरम्यान पाऊस इतर मंडळात पावसाची तुरळक, हलकी हजेरी लागली. नांदेड, मुदखेड, माहूर, अर्धापूर या तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत पावसाचा जोर अधिक होता. जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यात सरासरी ३० मिलिमीटर, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात सरासरी २४.९ मिलिमीटर, अंबाजोगाई २३.८ मिलिमीटर, परळी २९.५ मिलिमीटर, धारूर ३५.५ मिलिमीटर, नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्यात ३८.१ मिलिमीटर, मुदखेड ३५.३ मिलिमीटर ,माहूर २४.५ मिलिमीटर ,अर्धापूर ५१.४ मिलिमीटर, परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यात २०.५ मिलिमीटर, जिंतूर २४.६ मिलिमीटर, सोनपेठ ३०.८ मिलिमीटर, मानवत ३६ मिलिमीटर, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यात ५२.३ मिलिमीटर, कळमनुरी ४१.१ मिलिमीटर, बसमत ३१.२ मिलिमीटर तर औंढा तालुक्यात सरासरी ५६.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT