Marathwada Rain : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील ५० मंडलांत अतिवृष्टी

Rain update : पावासाने ओढ दिल्याने खरिपाचे बहुतांश भागांत मोठ नुकसान झाल्यानंतर मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला आहे. खासकरून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांत पावसाचा जोर जास्ती आहे. खरिपाच जे नुकसान व्हायचं ते झालं, मात्र रब्बीच्या अशा होत असलेल्या पावसाने उंचावल्या आहेत.
Rain update
Rain update Agrowon
Published on
Updated on

chhatrapati sambhaji nagar : मराठवाड्यातील आठपैकी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या सहा जिल्ह्यांत रविवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाची दमदार ते जोरदार हजेरी लागली. या जिल्ह्यातील ५० मंडलांत अतिवृष्टी झाली. लातूर व धाराशिव जिल्ह्यांत पावसाचा जोर तुलनेने खूप कमी होता. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीडमधील काही मंडलात धो-धो पाऊस झाला.

Rain update
Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात ४४ मंडलांत अतिवृष्टी

पावासाने ओढ दिल्याने खरिपाचे बहुतांश भागांत मोठ नुकसान झाल्यानंतर मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला आहे. खासकरून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यांत पावसाचा जोर जास्ती आहे. खरिपाच जे नुकसान व्हायचं ते झालं, मात्र रब्बीच्या अशा होत असलेल्या पावसाने उंचावल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सरासरी ६४.५ मिलिमीटर, पैठण ५४.६ मिलिमीटर, गंगापूर ४६, वैजापूर ५४.१, कन्नड ३६.८, सिल्लोड ३४, सोयगाव २६.७, तर सर्वाधिक सरासरी ७६.७ मिलिमीटर पाऊस सिल्लोड तालुक्यात नोंदला गेला. जिल्ह्यात सर्वांत कमी सरासरी ६.७ मिलिमीटर पाऊस फुलंब्री तालुक्यात झाला. जालना जिल्ह्यातील जालना तालुक्यात सरासरी ५९.९ मिलिमीटर, अंबड तालुक्यात ६०.३ मिलिमीटर, परतूर ३०.९ मिलिमीटर, बदनापूर ५९.९ मिलिमीटर, घनसावंगी २९.५ मिलिमीटर, तर मंठा तालुक्यात सरासरी १९.९ मिलिमीटर पाऊस झाला. भोकरदन तालुक्यात सरासरी १३.९ मिलिमीटर, तर जाफराबाद तालुक्यात सर्वांत कमी नव्हे अत्यल्प सरासरी १.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सर्वाधिक सरासरी ७८.८ मिलिमीटर, त्या पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यात ७१.१ मि.मी, वडवणी ३७.९ मि.मी, बीड १८.५ मि.मी, पाटोदा ३३.७ मि.मी, गेवराई ८.१ मि.मी, माजलगाव २३.२ मि.मी, केज २१.७ मि.मी, परळी २५.९ मि.मी, धारूर १८.४ मि.मी, शिरूर कासार तालुक्यात सरासरी १२.८ मिलिमीटर पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक सरासरी २३.५ मिलिमीटर त्यापाठोपाठ निलंगा तालुक्यात १०. मि.मी, रेणापूर मध्ये १०.९ मि.मी, तर शिरूर अनंतपाळ तालुक्यात सरासरी ११. मि.मी पाऊस झाला. इतर तालुक्यांत सरासरी दहा मिमीच्या आतच पाऊस झाल्याची नोंद झाली.

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात सरासरी २४.७ मिलिमीटर, कळंबमध्ये १५ मिलिमीटर, वाशी तालुक्यात सरासरी २९.२ मिलिमीटर पाऊस झाला. इतर तालुक्यात पावसाची सरासरी ही अल्प अत्यल्प स्वरूपाची राहिली. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, मुखेड, हदगाव, देगलूर, धर्माबाद आदी तालुक्यांत सरासरी २० ते ४२ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. परभणीतील परभणी, गंगाखेड, जिंतूर, सोनपेठ तालुक्यांत सरासरी २० ते २८ मि.मी दरम्यान तर मानवत व पाथरी तालुक्यात अनुक्रमे सरासरी ५० व ६६ मिलिमीटर पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा या तालुक्यांमध्ये सरासरी २० ते ४३ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. इतर तालुक्यांत पावसाचा जोर तुलनेने कमी होता.

Rain update
Maharashtra Rain Update : पावसाने तिसऱ्या दिवशी झोडपले

मराठवाड्यातील जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडल

छत्रपती संभाजीनगर : हाउसिंगपुरा ७६, कांचनवाडी १११.२५, चित्तेपिंपळगाव १५१.२५, हरसूल ७८, कचनेर ६७.२५, पंढरपूर ७६.७५, वरुडकाजी ६५, अडुळ ८१, पिंपळवाडी ७०.७५, बिडकीन १२४.७५, डोणगाव १०६.७५, वैजापूर ७०, शिऊर १०६.७५, लोणी ६५, गारज १२४, लासूरगाव ७१.५०, देवगाव ६५.५०, वेरूळ १२५, आमठाणा ७०.२५, अंभई ११८.५०.

जालना : जालना ग्रामीण १३१.२५, शेवली ७५.२५, रामनगर ७१.७५, पाचनवडगाव ७१.७५, अंबड ६६, धनगर पिंपरी १०४, जामखेड ९०.५०, रोहिलागड ७७.५०, बदनापूर १५४, रोशनगाव १०१.७५

बीड : आष्टी ६८.७५, कडा ९३.५०, दावलावडगाव ८९.७५, धानोरा १३२.५०, पिंपळा ७२.२५, अंबाजोगाई ७२, लोखंडी सावरगाव ७२,  

बर्दापूर १०६.२५, धर्मापुरी ६९

नांदेड : येवती ८९.५०, जहूर ८९.५०, अंबुलगा ८९.५०, शहापूर ८४.७५, नारंगल बु. ८४.७५

परभणी : पाथरी ९५.७५, बाभळगाव १३२.५०, मानवत ९५.२५

हिंगोली : डिग्रस ७२.२५, अंबा ७४, येहळेगाव ७२.२५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com