Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : मराठवाड्यात एक लाखावर शेतकऱ्यांचे नुकसान

धाराशिव आणि बीड जिल्ह्यात अजून पंचनामे नसल्याची स्थिती आहे. विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेला संप आता मागे घेण्यात आले आहेत.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील सात जिल्ह्यात १ ते २० मार्चदरम्यान अवकाळी पाऊस गारपीट, आदी नैसर्गिक आपत्तीने १ लाख ३३ हजार ३९७ शेतकऱ्यांचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज पुढे आला आहे.

या शेतकऱ्यांच्या जवळपास ९१ हजार ५२५.६७ हेक्टरवर शेती पिकाचे नुकसान झाल्याचं प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे. जसजसे पंचनामे होतील तसतसे नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या क्षेत्राचे चित्र स्पष्ट होईल.

वादळी पाऊस व गारपिटीने मराठवाड्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे होत्याचे नव्हते करून टाकले. सर्वाधिक फटका हा नांदेड जिल्ह्याला बसला असून त्या पाठोपाठ बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, धाराशिव या जिल्ह्यांमध्येही नुकसान झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३६ हजार ६६१ शेतकऱ्यांच्या १५ हजार ८८२ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले.

जालना जिल्ह्यात ११ हजार ६३४ शेतकऱ्यांच्या १५ हजार ९४.१७ हेक्टर, परभणी जिल्ह्यात ९ हजार १९१ शेतकऱ्यांच्या ५ हजार ०३१ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील १३ हजार २८६ शेतकऱ्यांच्या ५ हजार ६०४ हेक्टर, नांदेड जिल्ह्यातील २० हजार ५४६ शेतकऱ्यांच्या २४ हजार १६१ हेक्टर, बीड जिल्ह्यातील २१ हजार ४५९ शेतकऱ्यांच्या ११ हजार ३६५ हेक्टर तर लातूर जिल्ह्यातील १६ हजार ८४२ शेतकऱ्यांच्या ११ हजार ८९१ हेक्टर तर धाराशिव जिल्ह्यात २ हजार ४७२ शेतकऱ्यांच्या १५२५.९० हेक्टर क्षेत्रावर जिरायती, बागायत व फळ पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पंचनामांची गती धीमीच...

एकीकडे शेती पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असताना झालेल्या नुकसानीची पंचनामे करण्याची गती मात्र अत्यंत धीमी असल्याचे चित्र सोमवार(ता. २१) अखेरपर्यंत पाहायला मिळाले.

जिल्हा न्याय नुकसान झालेल्या क्षेत्राच्या तुलनेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केवळ २५ टक्के, हिंगोली २७ टक्के, नांदेड १३ टक्के, लातूर ३१ टक्के तर परभणी जिल्ह्यात ४० टक्के , जालना ३२ टक्के नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे झाल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली होती.

धाराशिव आणि बीड जिल्ह्यात अजून पंचनामे नसल्याची स्थिती आहे. विविध कर्मचारी संघटनांनी पुकारलेला संप आता मागे घेण्यात आले आहेत.

त्यामुळे आता तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पंचनामे गतीने करून त्यांना तत्काळ मदत देण्याची व्यवस्था शासनाने करण्याची आवश्यकता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Cabinet : खानदेशात यंदा चौघांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता

Fertilizer Shortage : संयुक्त खताची टंचाई; पर्यायी खते वापरा

Jalgaon ZP : जिल्हा परिषदेत तक्रारी, अडचणींवर कार्यवाही होईना

Labor Shortage : यवतमाळ जिल्ह्यातील कामे मजुरांअभावी खोळंबली

Agrowon Podcast : कांदा भावात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आजचे लसूण दर?

SCROLL FOR NEXT