Girna Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Water Projects : खानदेशात अनेक प्रकल्पांत जलसाठा कमीच

Water Shortage : खानदेशात अनेक सिंचन प्रकल्पांत जलसाठा कमी आहे. सर्वांत मोठे गिरणा धरण केव्हा पूर्ण भरेल, याची प्रतीक्षा आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात अनेक सिंचन प्रकल्पांत जलसाठा कमी आहे. सर्वांत मोठे गिरणा धरण केव्हा पूर्ण भरेल, याची प्रतीक्षा आहे. गिरणा धरणातील जलसाठा ११ टक्क्यांवरच स्थिर आहे. गिरणा धरण भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्यातील नांदगावात आहे. पण त्याचा उपयोग जळगाव जिल्ह्यात अधिक असून, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, धरणगाव, एरंडोल आदी भागांतील २१ हजार हेक्टरवरील रब्बीस त्यातील पाणी उपलब्ध होते.

तसेच १०० पेक्षा अधिक गावांच्या पाणी योजनांना गिरणेच्या पाण्याचा आधार असतो. चाळीसगाव, पाचोरा, भडगाव शहरासही गिरणातून पाणीपुरवठा केला जातो. १८ टीएमसी एवढी त्याची साठवण क्षमता आहे. परंतु त्यात यंदा ११ टक्केच जलसाठा आहे. हे धरण गिरणा पट्टा व उद्योगांसाठीही महत्त्वाचे आहे. मालेगावातील औद्योगिक वसाहतीसही त्यातून पाणी दिले जाते.

वाघूर धरणाची साठवण क्षमता नऊ टीएमसी आहे. हे धरण जामनेर तालुक्यात आहे. जामनेर, जळगाव शहरासह उद्योगास त्यातून पाणी दिले जाते. तसेच भुसावळ, जळगावातील रब्बीसही त्याचा आधार आहे. परंतु त्यातही ६३ टक्केच जलसाठा आहे. वाघूर नदीवर हे धरण असून, वाघूर नदीला यंदा चांगला पूर आलेला नाही. तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणातून विसर्ग सुरू आहे. त्यात यंदाही १०० टक्के जलसाठा होईल. जलपातळी नियंत्रणासाठी विसर्ग सुरू असून, त्यात ३९ ते ४० टक्के जलसाठा राखला जात आहे.

गिरणा पट्ट्यातील प्रकल्प कोरडेच

गिरणा पट्ट्यातील मन्याड, बहुळा, अग्नावती, भोकरबारी, बोरी या प्रकल्पांत जलसाठा हवा तसा नाही. अंजनी प्रकल्पातही कमी जलसाठा आहे. जामनेरातील तोंडापूर प्रकल्पदेखील भरलेला नाही. रावेरातील मंगरूळ व अभोरा प्रकल्पदेखील यंदा भरलेले नाहीत. यंदा फक्त यावलमधील मोर, हरिपुरा, वड्री, रावेरातील सुकी हे प्रकल्प भरले आहेत.

चोपड्यातील गूळ, धुळ्यातील शिरपुरातील अनेर प्रकल्पदेखील लवकरच भरतील, अशी स्थिर आहे. नंदुरबारातील दरा, देहली, चिरडे, सुसरी, इच्छागव्हाण आदी प्रकल्पांत मुबलक जलसाठा आहे. पण धुळ्यातील अमरावती, बुराई, सोनवद, मालनगाव आदी प्रकल्पांत जलसाठा फारसा नाही. पांझरा प्रकल्पातच फक्त काहीसा जलसाठा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gay Gotha Scheme: गायी-म्हशींसाठी गोठा बांधण्यास २.३१ लाखांपर्यंत अनुदान; जनावरांच्या संरक्षणासाठी सरकारची योजना

Rural Farmer Issue: ग्रामीण महाराष्ट्र कर्जबाजारी का होत आहे?

Soybean Farming: सोयाबीन पिकावर वाढू शकतो रोगांचा प्रादुर्भाव

Modern Fisheries: शेतीला दिली आधुनिक मस्त्यपालनाची जोड

Agro Industry: बचत गटातून मिळाल्या रोजगाराच्या नव्या वाटा

SCROLL FOR NEXT