Tur Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Rate : खानदेशात कोरडवाहू तुरीला एकरी दोन क्विंटलपर्यंत उतारा

Tur Market : खानदेशात तुरीची मळणी जवळपास पूर्ण होत आली आहे. उत्पादन यंदा कमी किंवा एकरी दीड ते दोन क्विंटल एवढे कोरडवाहू क्षेत्रात हाती येत आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव ः खानदेशात तुरीची मळणी जवळपास पूर्ण होत आली आहे. उत्पादन यंदा कमी किंवा एकरी दीड ते दोन क्विंटल एवढे कोरडवाहू क्षेत्रात हाती येत आहे. बागायती क्षेत्रातही एकरी पाच ते आठ क्विंटल एवढे उत्पादन मिळत आहे.

तुरीची लागवड खानदेशात कापसात आंतरपीक म्हणून केली जाते. तसेच काही शेतकऱ्यांचा कल मुख्य पीक म्हणून तूर लागवडीकडे आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील नवापूर, नंदुरबार भागात अनेक शेतकरी मुख्य पीक म्हणून तुरीची लागवड करतात. तर कापूस, सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांत आंतरपीक म्हणूनही तुरीची लागवड खानदेशात केली जाते.

यंदा सुमारे तीन हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली होती. ही लागवड यंदा बऱ्यापैकी होती. परंतु जूनमध्ये पावसाचा खंड होता. जुलैत पाऊस आला. पुन्हा ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. ऑक्टोबरमध्ये परतीचा पाऊस नव्हता. नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसात तुरीला काही भागात लाभ झाला. परंतु नैसर्गिक फटकाही बसला.

अनेक भागात तुरीत मर रोग आला आणि यात पीक वाळून पूर्णतः नुकसानही झाले. मर रोगाने २० ते २५ टक्के नुकसान अनेक भागात झाले. याचा परिणाम कोरडवाहू तूर उत्पादनावर अधिक झाला आहे. बागायती तूर पीक बरे होते. त्यात शेतकऱ्यांनी सिंचन केले. काही शेतकऱ्यांनी ठिबकद्वारे पाणी दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT