Jowar Fodder Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Fodder : जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांना कडब्याची चिंता

जळकोट तालुक्यात खरिपात ज्वारीचे क्षेत्र अत्यल्प झाले आहे. त्यामुळे पेरा नसल्याने कडबा निघत नाही.

Team Agrowon

Latur News : जळकोट या डोंगरी तालुक्यात उन्हाळ्यात शेतकरी जनावरांसाठी कडब्याला पसंती देतात. संपूर्ण उन्हाळा पुरेल इतका कडब्याची साठवण पशुपालकांकडून केली जाते.

परंतु खरिपात ज्वारी (Jowar) कोणी घेत नसल्याने कडबाटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे. उन्हाळ्यात पशुधन कसे सांभाळायचे? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

जळकोट तालुक्यात खरिपात ज्वारीचे क्षेत्र अत्यल्प झाले आहे. त्यामुळे पेरा नसल्याने कडबा निघत नाही. सिंचनाची सोय असलेल्या काही शेतकऱ्यांनी रब्बीमध्ये ज्वारी घेतली आहे. कडबाही कमी झाला असल्याने दिवसेंदिवस कडब्याच्या दरात मोठी वाढ होत आहे.

त्यामुळे वरचेवर ज्वारी पिकाचे क्षेत्र घटत आहे. मजूर टंचाईवर हार्वेस्टर उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे शेतकरी ज्वारी ऐवजी इतर पिकाकडे वळत असल्याने ज्वारीच्या कडब्याचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत आहे.

त्यामुळे एक हजार ते बाराशे रुपये शेकडा इतका दर कडब्याला सध्या असून त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

जनावरांना ओला चारा म्हणून वापरात येणारे गजरा गवत काही शेतकऱ्यांनी लावले असले तरी पाणी उपलब्ध असणारेच शेतकरी हा प्रयोग करताना दिसतात. सध्या जनावरांचा चारा मिळणे कठीण असल्याने उन्हाळा कसा काढायचा? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

बैल व इतर भाकड जनावरांसह कडबा हा दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त असतो. उन्हाळ्यात गुरांच्या चाऱ्याची कमतरता मोठ्या प्रमाणात भासते अशाप्रसंगी गंज लावून ठेवलेला कडबा दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त ठरतो.

आधीच शेतकऱ्यांच्या शेतमालांचे बाजारभाव ढासळले आहेत. त्यानंतर अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी केली.

डोंगरी तालुका असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष असते. सिंचनक्षेत्र कमी असल्याने हिरवा चारा उन्हाळ्यात नसतो. खरिपात ज्वारी घेणे परवडत नसल्याने कडबाटंचाईची चिंता असून पशुधन कसे जगवायचे हा प्रश्न आहे. बैल, गायी, म्हैस यांच्यासह भाकड जनावरांना कडबा लागतो, वाढती मजुरी व चारा यामुळे पशुधन ठेवणे कठीण झाले आहे.
गजानन बादुलगे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT