Pune News : जनावरांना ओला चारा (Fodder) म्हणून वापरात येणारे उसाचे वाडे आता हंगाम संपत आल्याने बंद झाले आहे. तर वाड्याला पर्याय असणारे मका (Maize Fodder), हत्तीघास, नेपिअर या गवताची लागण देखील कमी प्रमाणात आहे. त्यामुळे या चाऱ्याचे दर (Jowar Fodder Rate) वाढले आहेत. त्यातच वैरण म्हणून वापरला जाणाऱ्या ज्वारीच्या कडब्याचे दर शेकडा ३५०० ते ५००० रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
मागील काही वर्षांत दुग्ध उत्पादनात मोठी उलाढाल होत आहे. विविध डेअरी उद्योगांच्या माध्यमातून दुग्धपूरक उद्योग वाढीस लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुग्धोत्पादनात मोठी संधी असल्याने ते या व्यवसायाकडे वळत आहेत. पुणे विभागासह राज्यात गायी, म्हशी, शेळ्या, कालवडी, बैलांची जवळपास तीन ते साडे तीन कोटींची संख्या आहे.
व्यापाऱ्यांकडून अधिक कडबा खरेदी
पुरंदर, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर, खेड तालुक्यांत ज्वारीच्या कडब्याला चांगला दर आला आहे. या परिसरातून पशुपालक कडबा खरेदी करतात. मागील पंधरवड्यात अवकाळीच्या धास्तीने बाहेरगावच्या व्यापाऱ्यांनी मोठा कडबा खरेदी केला.
त्यामुळे स्थानिक पशुपालकांना कडबा कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे व वापसा लवकर आला नाही. त्यामुळे रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी दरवर्षीपेक्षा काही प्रमाणात कमी प्रमाणात झाल्याने चाऱ्याचे उत्पादन कमी होत आहे.
चालूवर्षी परिसरात कमी उत्पादनामुळे ज्वारीचे दर वाढणार आहेत. तसेच कडब्याच्या कमतरतेमुळे त्याचे सुद्धा भाव वाढतील. यामुळे दूध उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत येणार आहे.
- भाऊसाहेब पळसकर, ज्वारी उत्पादक, कर्डे, शिरूर.
दुधाचे दर वाढले की ग्राहकांकडून तक्रार केली जाते. मात्र चांगले पोषणमूल्य असलेल्या पशुखाद्याचे दरही दुधाच्या दरवाढीपेक्षा अधिक पटीने वाढले आहेत. ओला आणि सुका चाराही महागला आहे. त्यामुळे दुधाच्या प्रतिलिटर उत्पादनाचा खर्च वाढला आहे.
- विजय वाबळे, दुग्ध व्यावसायिक, केसनंद हवेली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.