Sterility Testing Agrowon
ॲग्रो विशेष

Sterility Testing : जळगाव जिल्ह्यात २३ हजारांवर जनावरांची वंध्यत्व तपासणी

Dr. Shyamkant Patil : जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत १ हजार ३६९ शिबिराच्या माध्यमातून २३ हजार ९३६ जनावरांची वंध्यत्व तपासणी करण्यात आली, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.श्यामकांत पाटील यांनी दिली.

Team Agrowon

Jalgaon News : गाय व म्हैसवर्गीय जनावरांमध्ये शंभर टक्के प्रजनन क्षमता व्हावी, त्यांचे वंध्यत्व कमी व्हावे. यासाठी जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागामार्फत १ हजार ३६९ शिबिराच्या माध्यमातून २३ हजार ९३६ जनावरांची वंध्यत्व तपासणी करण्यात आली, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.श्यामकांत पाटील यांनी दिली.

जिल्ह्यात १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत विशेष मोहीम घेत वंध्यत्व निवारण अभियान राबविण्यात आले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात जिल्ह्यात वंध्यत्वाने बाधित दुभती जनावरे यांची तपासणी करून त्यांच्या उपचार शिबिर झाले.

देशपातळीवर महाराष्ट्राचा दूध उत्पादनात सहावा क्रमांक असून २०१९ च्या २९ व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात ८ लाख ५० हजार गाय व म्हैस वर्ग पशुधन आहेत, यातील ३५ हजार ८२५० गाय व म्हैस वर्गीय जनावरे प्रजननक्षम आहेत. या अभियानातील शिबिरात गाई म्हशींच्या प्रजनन माजाचे चक्र, माज लक्षणे, म्हशी मधील मुका माज, कृत्रिम रेतन गर्भ तपासणी, वंध्यत्व निवारण, वैरण विकास कार्यक्रम, पशु यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.

जळगाव जिल्ह्याने १३६९ शिबिरात २३९३६ जनावरांची तपासणी केली. अहमदनगरच्या तुलनेने कमी मनुष्यबळ असतानाही जळगाव जिल्ह्याने अहमदनगर जिल्ह्यापेक्षा जास्त तपासणी केल्या आहेत. जिल्ह्यात वंध्यत्वाचा त्रास असणारे २३ हजार ९३६ जनावरांवर वंध्यत्व तपासणी करण्यात आली.

२१ हजार ४३९ जनावरांवर वंध्यत्व निवारणासाठी उपचार करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात असणाऱ्या १८२ पशू उपचार करणाऱ्या संस्थांमध्ये पशुसंवर्धन उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन पर्यवेक्षक, पशुधन पर्यवेक्षक आणि खासगी पशुधन पर्यवेक्षक यांनी शिबिरात जनावरांवर उपचार केले आहेत.

जी जनावरे उपचार व तपासलेले आहे त्यांना माज आल्यावर शासकीय पशुवैद्यकीय संस्थांशी संपर्क करून कृत्रिम रेतन करून घ्यावे.
डॉ.श्यामकांत पाटील , (पशुसंवर्धन उपायुक्त)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain: पावसाचा येलो, ऑरेंज अलर्ट; विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज

Zero Tillage Farming : शून्य मशागत तंत्रज्ञानाचा जागर

Natural Farming Campaign: अडीच हजार कोटींचे अभियान केंद्र सरकार राबविणार; २३ ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार प्रारंभ

Natural Farming : रासायनिक शेतीमुळे जमिनीची गुणवत्ता, माणसांचे आरोग्य धोक्यात

Fertilizer Shortage : खत टंचाईवरून कर्नाटकच्या विधानसभेत गोंधळ; एकेरी उल्लेख करत सत्ताधारी व विरोधक भिडले

SCROLL FOR NEXT