Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : धाराशिवमध्ये सात हजार हेक्टवरवरील पिके बाधित

Latur Rain : लातूरमध्ये पाच हजार हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान

Team Agrowon

Dharashiv News : लातूर/धाराशिव : दोन्ही जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूर जिल्ह्यात पाच हजार ६८० तर धाराशिव जिल्ह्यात सात हजार २७२ हेक्टरवरील पिके अतिवृष्टीमुळे बाधित झाली.

पिकांचे पंचनामे करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. दरम्यान घरे, रस्ते व अन्य मालमत्तेच्या नुकसानीची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार प्रशासनाने पिकांच्या नुकसानीची माहिती संकलित केली आहे. रविवारी (ता. १) व सोमवारी (ता. २) दोन्ही जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. जास्त पावसामुळे सखल भागातील पिके पाण्याखाली गेली. पाणी साचून पिकांचे नुकसान झाले.

एकाच दिवसी मोठा पाऊस झाल्याने त्याचा फटका पिकांना बसला. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. लातूरचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी नुकसानीचा आढावा घेऊन पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. तर धाराशिव जिल्ह्यातही पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यानुसार प्रशासनाने पंचनाम्यांचे नियोजन केले आहे. अतिवृष्टीत लातूर जिल्ह्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य मालमतांच्या नुकसानीची माहिती संकलित करण्यात येत आहे. धाराशिव जिल्ह्यातही याच पद्धतीने माहिती घेण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Farming: निर्यातयोग्य केसर आंबा उत्पादनाचे तंत्र

Government Scheme Implementation: प्रलंबित कामांना गती द्या; योजनांची अंमलबजावणी करा

Chhatrapati Sambhajinagar ZP President: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्षपदी गलांडे

Unseasonal Rain Damage: राज्याला गारपीट, अवकाळीचा तडाखा, गहू, हरभरा, ज्वारी पिकांचे नुकसान, शेतकरी चिंतेत

Chhatrapati Sambhajinagar ZP Budget: छत्रपती संभाजीनगर ‘झेडपी’चा ७.४३ कोटी शिलकीच्या अर्थसंकल्प

SCROLL FOR NEXT