Agriculture Tillage Work  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Tillage Work : दौंड तालुक्यात पावसाच्या उघडिपीमुळे मशागत कामांना वेग

Agriculture Update : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने थोडी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची शेतीच्या कामात लगबग सुरू आहे.

Team Agrowon

Rajegaon News : दौंड तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने थोडी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची शेतीच्या कामात लगबग सुरू आहे. सध्या उडीद, सोयाबीन, तसेच बाजरी पिकाची काढणी, ऊस लागवड या कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी कांदा लागवड चालू असून, यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्यावर लावलेल्या कांद्याची काढणीही चालू झाली आहे.

गणेशोत्सवात एकदा का पाऊस सुरू झाला की पाऊस उघडणार नाही त्यामुळे शेती कामात व्यत्यय येऊ शकतो म्हणून मिळालेल्या वेळेत कामे उरकून घेण्यावर शेतकऱ्यांचा भर राहणार आहे.

यंदा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसामध्ये सातत्य राहिल्याने पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर तण वाढलेले चित्र सगळीकडे दिसून येत आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. आठ दिवसांपासून राजेगाव परिसरात पावसाने उसंत दिली आहे. त्यामुळे मशागतीच्या कामांना वेग आला असून, मका, बाजरी, सोयाबीन खुरपणीची लगबग सुरू आहे.

खरीप हंगामातील पेरणी होताच सुरू झालेला पाऊस आता महिनाभराने ओसरला आहे. त्यामुळे मध्यंतरी शेती मशागतीची कामे रखडली होती. पावसामुळे शेताकडे फिरकणेही शक्य न झाल्याने पिकांमध्ये तणाचे प्रमाण वाढले होते तर फवारणीची कामेही झालेली नाहीत. आता गेल्या आठ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे दिवस उजाडला की शेतकरी मशागतीच्या कामासाठी शेतीची वाट धरू लागला आहे. योग्य वेळी योग्य ती मशागत झाली तर पिकांची वाढ झपाट्याने होते हे तत्त्व शेतकऱ्यांना ठाऊक झाले आहे.

जिल्ह्यावर पावसाची कृपादृष्टी

राज्यात पावसाने उघडीप दिली असून मिळालेल्या उघडिपीचा फायदा शेतकरी घेत आहेत. हंगामाच्या सुरुवातीच्या काळापासूनच पुणे जिल्ह्यावर पावसाची कृपादृष्टी राहिलेली आहे. तर जुलै-ऑगस्ट महिन्यांत सलग पाऊस लागून राहिल्याने काही क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. उर्वरित पिकांमधून उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न हे सुरू आहेत. त्यामुळे कोळपणी, खुरपणी सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT