Marathwada Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील पाचही जिल्ह्यात पावसाचा जोर कमी

Rain News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर या पाचही जिल्ह्यातील बहुतांश मंडळात गुरुवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाचे हजेरी तुरळक हलकीच राहिली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर या पाचही जिल्ह्यातील बहुतांश मंडळात गुरुवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाचे हजेरी तुरळक हलकीच राहिली. छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यातील काही मंडळात मध्यम ते दमदार पाऊस झाला.

यंदा पावसाच्या आगमन लांबणीवर पडले. सोबतच सक्रिय झालेला पाऊस लहरी स्वरूपाचा बरसात असल्याचे चित्र आहे. बुधवारी(ता. २८)सकाळपर्यंत अनेक मंडळांमध्ये मध्यम, दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाचा जोर गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात ओसरल्याचे चित्र पाहायला मिळाले. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील ८३ पैकी ८० मंडळात तुरळक हलका मध्यम पाऊस झाला.

जिल्ह्यातील गंगापूर व वैजापूर तालुक्यातील ९ मंडळात पावसाची हजेरी दमदार स्वरूपाची राहिली. या नऊही मंडळामध्ये २८ ते ४६ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ४९ पैकी ३९ मंडळात तुरळक हलका पाऊस झाला.

बीड जिल्ह्यातील ५५ मंडळात तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यातील माजलगाव व गेवराई तालुक्यातील ११ मंडळात पावसाचे हजेरी मध्यम स्वरूपाची राहिली.

लातूर जिल्ह्यातील ४७ मंडळात तुरळक, हलका पाऊस झाला. तर धाराशिव जिल्ह्यातील ३६ मंडळात पावसाची हजेरी तुरळक ते हलक्या स्वरूपाचीच राहिली. पावसाचा लहरीपणा अनुभवायला येत असतानाच शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीला प्राधान्य दिले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी आदी कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये कपाशी लागवडीला गती मिळाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT