Pune rain Update : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम पट्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा या तालुक्यांत पावसाच्या मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून या भागात पावसाचा जोर कायम आहे.
तसेच घाटमाथ्यावरही चांगलाच पाऊस पडत आहे. त्यामुळे भात खाचरे भरत आले असून ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहे. काही ठिकाणी अजूनही पाऊस कमी असला तरी पावसाची संततधार ही सुरूच आहे.
जवळपास एक आठवडा होत आला आहे. या काळात चांगला पाऊस पडला असला तरी अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणाची स्थिती कायम आहे. गुरुवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यंत वेल्हा येथे सर्वाधिक १०२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे.
याशिवाय अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने धरणांत पाण्याची आवक सुरू झाली आहे. हळूहळू पाण्याची वाढ होईल, अशी अपेक्षा जलसंपदा विभागाला आहे.
पश्चिमेकडील मुळशी तालुक्यातील पौड येथे २०.५ मिलिमीटर पाऊस पडला. तर घोटावडे २०.५, थेरगाव १५.८, माले ४३.८, मुठे ३४.८, पिरंगुट १६.०, भोरमधील भोर १४.०, भोलावडे १९.५, नसरापूर १८.०, वेळू १३.८, आंबवडे १६.८, संगमनेर १०.८, निगुडघर २४.० मिलिमीटर पाऊस पडला.
मावळमधील खडकाळा येथे सर्वाधिक ९६.३ मिलिमीटर पाऊस पडला असून वडगाव मावळ १३.३, तळेगाव १३.०, काले ५०, कार्ला ३५.५, लोणावळा ४२.३, शिवणे ३५.८ मिलिमीटर पाऊस पडला. वेल्ह्यातील पानशेत ४७.८, विंझर ३०, आंबवणे २१.० मिलिमीटर पाऊस बरसला.
हवेलीतील कोथरूड १६.०, खेड १३.० मिलिमीटर पाऊस पडला असून पुणे वेधशाळा, केशवनगर, खडकवासला, थेऊर, उरुळी कांचन, भोसरी, चिंचवड, कळस, हडपसर, वाघोली परिसरात तुरळक सरी पडल्या. जुन्नरमधील ओतूर, जुन्नर येथे ११.८ मिलिमीटर तर, राजूर येथे १८.३ मिलिमीटर पाऊस पडला.
तर नारायणगाव, वडगाव आनंद, निमगाव सावा, बेल्हा, डिंगोरे, आपटाळे तुरळक सरी पडल्या. खेडमधील वाडा ११.३, कुडे १९.५, चाकण १४.५ मिलिमीटर तर पाईट, राजगुरुनगर, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, कडुस येथे हलक्या सरी पडल्या. आंबेगाव येथे ५४.३ मिलिमीटर पाऊस पडला असून घोडेगाव, पारगाव, मंचर येथे तुरळक सरी कोसळल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.