Agriculture Produce Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Produce Storage : शेतीमाल साठवणुकीचे सुधारित तंत्रज्ञान

Agriculture Technology : पावसामुळे वाढणारी आर्द्रता, तापमानातील बदल, आणि बुरशी यासारख्या अडचणींवर मात करण्यासाठी शेतीमाल साठवणुकीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. शीतकरण यंत्रणा, वातानुकूलित साठवणूक आणि व्हॅक्यूम पॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक झाला आहे.

Team Agrowon

साक्षी जिवतोड, डॉ. अनुप्रिता जोशी, डॉ. विजया पवार

Indian Agriculture : पावसाळ्यात शेतीमाल साठवणुकीच्या समस्या उद्‍भवतात, विशेषतः अन्न धान्य, भाजीपाला आणि फळांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पावसामुळे वाढणारी आर्द्रता, तापमानातील बदल, आणि बुरशी यांसारख्या अडचणींवर मात करण्यासाठी अन्न साठवणूक तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यावश्यक आहे. यासाठी विविध तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर करता येतो.

हवामान नियंत्रित साठवणूक

पावसाळ्यात हवामानातील बदल, वाढलेली आर्द्रता आणि तापमान यामुळे अन्न धान्याची गुणवत्ता राखणे आव्हानात्मक ठरते. अशा परिस्थितीत हवामान नियंत्रित साठवणूक यंत्रणा उपयुक्त ठरते. ही यंत्रणा धान्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

हवामान नियंत्रित साठवणूक म्हणजे तापमान आणि आर्द्रता नियंत्रित ठेवण्यासाठी विशेष प्रकारच्या गोदामांचा वापर. अशा गोदामांमध्ये शीतकरण यंत्रणांचा वापर करून धान्य साठवले जाते.

फायदे

हवामान नियंत्रित साठवणूक यंत्रणेत तापमान नियंत्रित ठेवले जाते. पावसाळ्यात तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होऊ शकतो, ज्यामुळे अन्न धान्याची गुणवत्ता खराब होऊ शकते. या यंत्रणेमुळे तापमान स्थिर राहते. गहू, तांदूळ, मका यासारखी धान्ये १५ ते २० अंश सेल्सिअस तापमानात साठवली जातात.

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता वाढते, ज्यामुळे बुरशी आणि कीटकांचा त्रास वाढतो. हवामान नियंत्रित साठवणूक यंत्रणेमध्ये आर्द्रता नियंत्रित ठेवली जाते, ज्यामुळे अन्न धान्य सुरक्षित राहते.

पालेभाज्या आणि फळे ६० ते ७० टक्के आर्द्रता राखून साठवली जातात. बुरशी आणि कीटकांमुळे अन्नधान्याची गुणवत्ता कमी होते. हवामान नियंत्रित यंत्रणेमुळे या समस्यांवर मात करता येते.

हवामान नियंत्रित यंत्रणेच्या मदतीने अन्न धान्य दीर्घकालीन साठवले जाऊ शकते. यामुळे उत्पादनाचा योग्य दर मिळवणे शक्य होते.गहू, तांदूळ यांसारखी धान्ये ६ महिने ते १ वर्षापर्यंत साठवता येतात. तापमान आणि आर्द्रता नियंत्रित असल्यामुळे अन्न धान्याची गुणवत्ता आणि ताजेपणा टिकून राहतो.

फळे, भाजीपाल्याचा ताजेपणा २ ते ३ आठवडे चांगला राहतो. योग्य साठवणुकीमुळे उत्पादनाचा अपव्यय कमी होतो. यामुळे आर्थिक नुकसान टाळता येते. धान्य, फळे आणि भाज्यांचे २० ते ३० टक्के नुकसान कमी होते.

वातानुकूलित साठवणूक

वातानुकूलित साठवणुकीत वातानुकूलन यंत्रांचा वापर केला जातो. हे यंत्र अन्नाच्या साठवणुकीमध्ये योग्य तापमान राखतात. पावसाळ्यात आर्द्रता वाढल्यामुळे धान्य सडण्याची आणि खराब होण्याची शक्यता अधिक असते. अशा परिस्थितीत वातानुकूलित साठवणुकीचे तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरते.

पावसाळ्यात वातावरणातील जास्त आर्द्रतेमुळे विपरीत परिणाम होतो. बटाटा आणि कांदा १० ते १२ अंश सेल्सिअस तापमानात आणि ८५ ते ९० टक्के आर्द्रतेत साठवतात. यामुळे त्यांच्या टिकाऊपणात वाढ होते. फळे, भाजीपाल्याची गुणवत्ता टिकवून ठेवता येते. ताजेपणा आणि पौष्टिकता कायम राहते. साठवणक्षमता वाढते.

नियंत्रित तापमान आणि आर्द्रतेमुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.पालेभाज्यांसाठी ० ते १ अंश सेल्सिअस तापमान आणि ९५ ते १०० टक्के आर्द्रता ठेवली जाते. यामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कमी होते.

केळी साठविण्यासाठी १३ ते १४ अंश सेल्सिअस तापमान आणि ९० ते ९५ टक्के आर्द्रता ठेवली जाते. यामुळे केळी लवकर पिकत नाहीत. अधिक काळ ताजेपणा राहतो. टोमॅटो १० ते १२ अंश सेल्सिअस तापमान आणि ८५ ते ९० टक्के आर्द्रतेमध्ये साठवतात. यामुळे टोमॅटो अधिक काळ टिकतात.

वाळवणी तंत्रज्ञान

धान्य, भाजीपाला आणि फळांची दीर्घकालीन साठवणूक करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करतात. अन्न पदार्थातील ओलावा काढून टाकला जातो. सुकविण्यासाठी नियंत्रित तापमान आवश्यक असते.

उदाहरणार्थ, धान्य सुकविण्यासाठी ४५ ते ५० अंश सेल्सिअस, कांदे सुकविण्यासाठी ३० ते ३५ अंश सेल्सिअस आणि मिरची सुकविण्यासाठी ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमान ठेवले जाते. यामुळे कीड, रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.

व्हॅक्यूम पॅकिंग

या पद्धतीत पॅकेटमधून हवा काढून टाकली जाते. व्हॅक्यूम पॅकिंगमुळे अन्नधान्य आणि इतर उत्पादने हवेच्या संपर्कात येत नसल्यामुळे ती अधिक काळ ताजी राहतात. जिवाणू आणि बुरशींची वाढ होत नाही.

त्यामुळे अन्नधान्य खराब होण्याचा धोका कमी होतो. अन्नाचे पोषणमूल्य, स्वाद आणि गुणवत्ता कायम राहते. व्हॅक्यूम पॅक केलेले अन्नधान्य कमी जागा ठेवता येत असल्यामुळे त्याची साठवण, वाहतूक करणे सोपे होते.

साक्षी जिवतोड, ९३५६०७३९६५

डॉ. विजया पवार ९४२०६२६५३३

(अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

Union Budget 2026: आर्थिक वाढीसाठी सर्वंकष प्रयत्नांचा संकल्प

Agriculture Union Budget: अन्नदाता शेतकरी पुन्हा एकदा वाऱ्यावर...!

SCROLL FOR NEXT