Solapur Zilha Bank  Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur Zilha Bank : चुकीच्या पद्धतीने कर्जवाटप, तत्कालीन संचालकांना नोटिसा

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून चुकीच्या पद्धतीने केलेले कर्जवाटप आणि वाटप केलेल्या कर्जाच्या थकबाकीमुळे बँकेचे कोट्यवधींचे नुकसान झाले असल्याचा ठपका ठेवत यासंबंधी सहकार विभागाने नेमलेले प्राधिकृत अधिकारी निवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी तत्कालीन अध्यक्ष, संचालकांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत.

त्यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने, दीपक साळुंखे यांच्यासह ४५ नेते मंडळींचा समावेश आहे.

सहकार कायदा कलम ८८ अन्वये सहकार विभागाने निवृत्त अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णीवाल यांची यामध्ये प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या नोटिशीवर म्हणणे सादर करण्यासाठी पहिली सुनावणी येत्या ५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सोलापूर जिल्हा सहकारी बँकेच्या मुख्यालयातील लोकनेते बाबूराव (अण्णा) पाटील सभागृहात होणार आहे.

बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने कर्जवाटप केलेल्या प्रकरणांचा डॉ. तोष्णीवाल यांनी अभ्यास केला आहे. प्रकरणनिहाय जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी नोटीस बजाविण्यात आल्या आहेत.

प्रामुख्याने जिल्ह्यातील शंकर साखर कारखाना, सांगोला, स्वामी समर्थ साखर कारखाना, सिद्धनाथ शुगर, आदित्यराज शुगर, गोविंदपर्व अॅग्रो, संतनाथ साखर कारखाना यासह लातूर, सांगली आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही कारखान्यांना चुकीच्या पद्धतीने कर्जेवाटप केल्याचा ठपका या संचालकांवर आहे. तसेच त्याच्या वसुलीबाबतही प्रयत्न झाले नाहीत.

नोटिसा बजावण्यात आलेले तत्कालीन प्रमुख संचालक

माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार वि. गु. शिवदारे, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, माजी आमदार ब्रह्मदेव माने, माजी आमदार एस. एम. पाटील, माजी आमदार बाबूराव चाकोते, माजी आमदार चांगोजीराव देशमुख, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, आमदार बबनराव शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार धनाजीराव साठे, माजी आमदार निर्मला ठोकळ. त्याशिवाय काही अधिकारी-कर्मचारी यांचाही यामध्ये समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Warehouse : गोदामाच्या रचनेनुसार उंचीचे नियोजन

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

SCROLL FOR NEXT