मुकुंद धजेकर
Indian Agriculture : कृषी क्षेत्रामध्ये कोणत्याही पीक लागवडीचे यश हे खतांच्या प्रभावी वापरावर अवलंबून असते. पीक उत्पादनामध्ये महत्त्वाच्या असलेल्या नत्र, स्फुरद आणि पालाश या तीन घटकांपैकी स्फुरदाचा १६ टक्के इतका पुरवठा करणारे सिंगल सुपर फॉस्फेट (SSP) हे खत अत्यावश्यक ठरते.
जमिनीची सुपीकता सुधारण्यात आणि वनस्पतींची वाढ, पीक उत्पादन वाढविण्यात सुपर फॉस्फेट महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
फॉस्फरस हे प्रकाशसंश्लेषण, ऊर्जा हस्तांतर आणि मुळांच्या विकासासह विविध चयापचय प्रक्रियांसाठी वनस्पतींना आवश्यक असे पोषक तत्त्व आहे. एसएसपी हे फॉस्फरसचे सहज विरघळणारे स्वरूप असून, ते वनस्पतीच्या शोषणासाठी सहज उपलब्ध होते. योग्य प्रमाणात उपलब्ध झाल्यास मजबूत मुळे, मुळांचा विकास आणि एकूणच वनस्पतीच्या निरोगी वाढीस प्रोत्साहन देते.
आता सुधारित एसएसपी खतामध्ये फॉस्फरससोबत कॅल्शिअम व गंधक ही दुय्यम अन्नद्रव्ये आणि झिंक, बोरॉन व मॅग्नेशिअम ही अशी अन्य महत्त्वाची सूक्ष्म अन्नद्रव्येही उपलब्ध होतात.
त्यामुळे वनस्पतींची रोग, कीटक आणि प्रतिकूल पर्यावरणीय परिस्थितींविरुद्ध प्रतिकारशक्ती सुधारते. याव्यतिरिक्त, फॉस्फरस फुलांच्या आणि फळांच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. परिणामी, उत्पादन आणि त्याची गुणवत्ता वाढवते.
सिंगल सुपर फॉस्फेट वापरण्याचा एक प्राथमिक फायदा म्हणजे त्याची जमिनीची सुपीकता सुधारण्याची क्षमता. या खतामुळे मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यास मदत होते. पाण्याचा ताण कमी राहण्यात मदत होते.
एकूणच विचार करता तृणधान्ये, कापूस सोयाबीन, भाजीपाला, फळ पिकांमध्ये एसएसपीचा समावेश करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांनी त्यासाठी केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची शाश्वती असते. मात्र स्फुरदयुक्त खताचा वापर पीकनिहाय व क्षेत्रनिहाय असलेल्या शिफारशी आणि मार्गदर्शक तत्त्वानुसार केला पाहिजे.
विशेषतः पावडर स्वरूपातील सुपर फॉस्फेटचा वापर करण्याऐवजी दाणेदार स्वरूपातील खताचा वापर केल्यास पाण्यासोबत वाहून जाण्यामुळे होणारे पाण्याचे प्रदूषण कमी राखता येईल.
युरिया, सुपर फॉस्फेट व पोटॅश यांच्या मिश्रणातून पिकांच्या मागणीनुसार नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त मिश्रखते शेतकरी घरच्या घरी तयार करू शकतात. शेती आणि वनशेतीमध्येही एसएसपी हे अनमोल खत ठरू शकते.
(लेखक आर. एम. फॉस्फेटस अॅण्ड केमिकल्स. प्रा. लि.चे असोसिएट व्हॉइस प्रेसिडेंट आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.