Woman Empowerment  Agrowon
ॲग्रो विशेष

Millet Importance : सुदृढ आरोग्यासाठी पौष्टिक भरडधान्याचे महत्त्व

Millet Food : महिलांच्या सुदृढ आरोग्यात पौष्टिक भरडधान्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

Team Agrowon

Pune News : महिलांच्या सुदृढ आरोग्यात पौष्टिक भरडधान्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. घरातील महिला सुदृढ निरोगी असेल, तर संपूर्ण कुटुंब सुदृढ राहते. यासाठी महिलांनी स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या आहारात भरड धान्याचा समावेश करावा, असे आवाहन ससून रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ चैताली काळबोंडे यांनी केले.

खडकवाडी (ता. आंबेगाव) येथे टीव्हीएसच्या श्रीनिवासन सर्व्हिसेस ट्रस्टच्या माध्यमातून ‘भरडधान्य व महिला आरोग्य’ या संकल्पनेवर जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी काळबोंडे बोलता होत्या.

टीव्हीएस कंपनीच्या वतीने सामाजिक दायित्व निधीतून, शिरूर, आंबेगाव व खेड या तालुक्यांमध्ये ग्रामविकास आणि ग्रामआरोग्यावर काम चालू आहे. महिलांच्या सर्वांगीण विकास व्हावा म्हणून संस्थेच्या माध्यमातून २७० बचत गट चालवले जातात. ज्यामध्ये महिलांचे सक्षमीकरण केले जाते.

याच विषयाला अनुसरून महिलांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी, त्यांच्यात आरोग्यविषयी जागृती निर्माण होण्यासाठी यावर्षीचा जागतिक महिला दिवस हा ‘भरडधान्य व महिला आरोग्य’ या संकल्पनेवर राबविण्यात आला.

या वेळी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या निवेदिता शेटे यांनी या वेळी महिलांना भरडधान्यापासून बनवलेल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये असलेल्या व्यावसायिक संधींची ओळख करून दिली.

या निमित्ताने शहरी भागामध्ये कशा पद्धतीने महिला बचत गट आपला व्यवसाय उभा करू शकतो याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला खडकवाडीच्या सरपंच कमल सुक्रे, वाळुंजनगरच्या सरपंच तृप्ती वाळुंज, वडगावपीरच्या सरपंच मीरा पोखरकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका जयश्री शिंदे कृषी साहाय्यक शेळके उपस्थित होत्या. सूत्रसंचालन दीक्षा गुलाब वाळुंज यांनी केले. प्रास्ताविक उषा देशमुख यांनी केले. आभार संगीता वाळुंज यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT