Soybean Cotton Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Cotton MSP : ‘मोदी गॅरंटी योजने’ची राज्यात अंमलबजावणी करा

Modi Guarantee : निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने मोदींची गॅरंटी म्हणून छत्तीसगडमध्ये धानाची हमीभावापेक्षा ४० टक्‍के अधिक दराने खरेदीचे आश्‍वासन दिले आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने मोदींची गॅरंटी म्हणून छत्तीसगडमध्ये धानाची हमीभावापेक्षा ४० टक्‍के अधिक दराने खरेदीचे आश्‍वासन दिले आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील भाजपप्रणीत राज्य सरकारने ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणत सोयाबीन, कापूस उत्पादकांना ४० टक्‍के वाढीव दर द्यावा, अशी मागणी शेती विषयाचे अभ्यासक विजय जावंधिया यांनी केली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राव्दारे त्यांनी ही मागणी केली आहे. त्यानुसार, छत्तीसगड राज्यात धान उत्पादकांची संख्या अधिक आहे. यंदा केंद्र सरकारने धानाला २१८३ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. छत्तीसगडमध्ये भाजप सरकार आल्यास त्यांना अतिरिक्‍त ४० टक्‍के बोनस देण्यात येईल.

त्यामुळे धानाचा भाव ३१०० रुपये प्रतिक्‍विंटलवर जाईल. पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात देखील या योजनेची अंमलबजावणी होत सोयाबीन, कापूस उत्पादकांना ४० टक्‍के अतिरिक्‍त दर मिळावा, अशी मागणी आहे.

यंदा सोयाबीन, कपाशीची उत्पादकता विपरीत वातावरणामुळे प्रभावित झाली आहे. उत्पादकता खर्चाची भरपाई होणार नाही, अशी स्थिती आहे. कापूस, सोयाबीनला बोनसची योजना महाराष्ट्रात राबविल्यास ७०२० रुपयांचा कापसाचा हमीभाव असल्यास तो दर ९८०० तर सोयाबीन ४६०० रुपयांवरून ६५०० रुपयांवर जाईल.

पंतप्रधान मोदी यांचे ‘वन नेशन वन मार्केट’चे स्वप्न आहे, या योजनेच्या माध्यमातून ते प्रत्यक्षात येणार आहे. परिणामी या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्रात व्हावी, अशी मागणी श्री. जावंधिया यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT