Chandrkant Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur DPDC Meeting : ‘जिल्हा वार्षिक’मधील कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवा

Team Agrowon

Solapur News : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजनेतून ८५७ कोटी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी समितीला ३२३ कोटी ५५ लाखाची तरतूदही प्राप्त झाली आहे, त्यामुळे प्रशासकीय मंजुरी दिलेल्या कामांची निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी (ता.३) दिली.

नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री. पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल उगले- तेली, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका वीणा पवार, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता असल्याने जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची सर्व संबंधित विभाग प्रमुखांनी निविदा प्रक्रिया त्वरित करून शक्य असेल, तर कामांचे कार्यारंभ आदेशही वितरित करावेत.

जिल्हा वार्षिक योजनेच्या एकूण ८५७ कोटी २८ लाखाच्या मंजूर निधीतून सर्वसाधारण योजनेसाठी ३१८ अनुसूचित जाती उपाय योजनेसाठी ४.८ कोटी आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेसाठी १.१७ कोटी असे एकूण ३२३ कोटी ५५ लाखाच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता समितीने प्रदान केलेली आहे.

त्यामुळे ही कामे निविदा प्रक्रिया पर्यंत वेळेत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी निर्देशित केले. वितरित केलेली तरतूद ही १४९ कोटी असून, झालेला खर्च ८४ कोटी ९ हजार इतका आहे. खर्चाची टक्केवारी ही फक्त २५ टक्के असून, ही टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

निविदा प्रक्रिया वेळेत राबवणार

प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत मंजूर निधी, प्राप्त निधी, प्रशासकीय मान्यता व झालेला खर्च याविषयी सविस्तर माहिती देऊन विधानसभा निवडणूक २०२४ च्या आचारसंहितेपूर्वी प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची निविदा प्रक्रिया करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करेल, असे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Procurement Center : मका, सोयाबीन किमान आधारभूत खरेदी केंद्रे सुरू करावीत

Rabi Season 2024 : शेतात गाळ, माती, शेणखत टाकण्यास वेग

Grape Farming : ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज

Kasuri Methi Market: जास्त उत्पादन देणारी कसुरी मेथीची शेती कशी कराल ?

Banana Cultivation : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा कमी

SCROLL FOR NEXT