Soybean Disease  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Disease : ‘खोडकुज’चा प्रसार थांबविण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात

Soybean Crop Management : पावसाचा दीर्घ खंड, जमिनीचे वाढलेले तापमान, त्यानंतर झालेला पाऊस, त्यामुळे निर्माण झालेल्या पोषक वातावरणामुळे सोयाबीनवर खोडकुज (चारकोल रॉट), मूळकुज या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाचा उद्रेक झाला.

Team Agrowon

Parbhani News : पावसाचा दीर्घ खंड, जमिनीचे वाढलेले तापमान, त्यानंतर झालेला पाऊस, त्यामुळे निर्माण झालेल्या पोषक वातावरणामुळे सोयाबीनवर खोडकुज (चारकोल रॉट), मूळकुज या बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावाचा उद्रेक झाला. सोयाबीनच्या उशिरा परिपक्व होणाऱ्या वाणांमध्ये या रोगाचा जास्त प्रादुर्भाव आढळून येत आहे.

शेतकऱ्यांनी या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी जैविक बुरशीनाशकांची आळवणी, तसेच शिफारशीत रासायनिक बुरशीनाशकांची योग्य प्रमाणात तज्ज्ञांचे तसेच सुरक्षितरीत्या फवारणी करून या रोगाचे व्यवस्थापन करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र विभागातील प्रा. डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या अभिनव संकल्पनेतून मराठवाड्यातील शेतकऱ्यांकरिता कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांच्यातर्फे विविध पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) व फलोत्पादन पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत (हॉर्टसॅप) ऑनलाइन कृषी संवाद मालिकेचा १० भाग बुधवारी (ता. २७) आयोजित करण्यात आला होता. या वेळी डॉ. अंबाडकर बोलत होते.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी अध्यक्षस्थानी होते. विभागीय कृषी सहसंचालक डॉ. तुकाराम मोटे (छत्रपती संभाजीनगर विभाग), साहेबराव दिवेकर (लातुर विभाग), कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, विभागीय कृषिविद्यावेत्ता डॉ. एस. बी. पवार, डॉ. अरुण गुट्टे, क्रॉपसॅपचे समन्वय अधिकारी डॉ. अनंत लाड, क्रॉपसॅपचे संशोधन सहयोगी डॉ. राजरतन खंदारे, हॉर्टसॅपचे संशोधन सहयोगी डॉ. योगेश मात्रे, दीपक लाड सहभागी झाले होते.

प्रास्ताविक डॉ. नेहरकर यांनी केले. डॉ. अंबाडकर म्हणाले, की विदर्भ तसेच मराठवाड्यातील सोयाबीनवर खोडकुज व मूळकुज रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते, असे सांगण्यात आले. कपाशीवरील ‘लाल्या’ विकृती व बोंडसड या व्यवस्थापनावर माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील कृषी अधिकारी, कृषी विस्‍तारक शेतकरी सहभागी झाले होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate In Maharashtra : कांदा निर्यात धोरणामुळेच दर घसरले असे म्हणता येणार नाही; लोकसभेत केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

Opposition MPs Protest: विरोधी खासदारांची काळे कपडे घालून संसद परिसरात निदर्शने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज तहकूब

El Nino Update : एल निनो मार्च २०२७ पर्यंत टिकण्याची ९७ टक्के शक्यता; अमेरिकेच्या हवामान संस्थेचा अंदाज

Rainwater Harvesting: पर्जन्यजल संधारण : महत्त्व, नियोजन अन् प्रभावी व्यवस्थापन

Smart Mango Farming: ९० एकरांतील व्यवस्थापन तंत्रज्ञानामुळे झाले सुलभ

SCROLL FOR NEXT