Sand Mining Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Sand Mining : सोलापूर जिल्ह्यात बेकायदा वाळू उपसा सुरू

Illegal Sand Mining Update : सोलापूर जिल्ह्यात रात्रंदिवस बेकायदा वाळू उपसा सुरू असून देगाव- वाळूज (ता.मोहोळ ) येथील ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळेही वाळू माफियांमुळे धोक्यात आली आहेत.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात ६०० रुपये प्रति ब्रास वाळू देण्याच्या राज्य शासनाच्या योजनेला सपशेल अपयश आले असून नव्या वाळू धोरणाने भ्रमनिरास केला आहे. जिल्ह्यात रात्रंदिवस बेकायदा वाळू उपसा सुरू असून देगाव- वाळूज (ता.मोहोळ ) येथील ऐतिहासिक वास्तू, धार्मिक स्थळेही वाळू माफियांमुळे धोक्यात आली आहेत. हे सर्व सुरू असताना जिल्हा प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.

राज्य सरकारच्या नव्या वाळू धोरणानुसार, सहाशे रुपये प्रति ब्रॉस या दराने सर्वांना वाळू मिळणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासनाने वाळू लिलाव जाहीर केले होते. मात्र, रीतसर वाळू विक्रीपेक्षा बेकायदा वाळू विक्रीमधून मिळणारा फायदा लक्षात घेऊन जिल्ह्यातील वाळू माफिया व भ्रष्ट अधिकाऱ्यांनी या नवे वाळू धोरण गुंडाळून ठेवले आहे.

सध्या जिल्ह्यात कुणालाही नव्या धोरणानुसार वाळू मिळत नाही. दुसरीकडे बेकायदा वाळू उपसा मात्र जोरात सुरू आहे. मोहोळ तालुक्यातील देगाव- वाळूज येथून भोगावती नदीतून चक्क जेसीबीद्वारे वाळू उपसा सुरू आहे.

या वाळू माफियांच्या वाहनांचा रात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. पावसाअभावी पाण्याची पातळी खालावलेली असताना प्रचंड वाळू उपसा सुरू असल्याने नदी पत्राच्या भूगर्भातील पाण्याची पातळी आणखीनच हलवण्याचा धोका निर्माण झाला आहे.

प्रशासनाची अळीमिळी गुपचिळी

वैराग- मोहोळ या राज्य रस्त्यावरून खुलेआम वाळू वाहतूक सुरू असताना पोलिस व महसूल प्रशासनाला ही वाहने सापडत नाहीत हे विशेष. वाळूज येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या पोलिसांसमोरून वाळूची वाहने गेली, तरी पोलिसांनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. देगावच्या बस स्थानकावर रात्रभर पहारा देणारे पोलिस हेच वाळू साथीदार असल्याची चर्चा गावात सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT