Sand Policy
Sand PolicyAgrowon

Sand Mining News : जळगावात वाळूउपसा बंद

Sand Update : नदीपात्रातून वाळूउपसा बंदचे आदेश काढताच महसूल विभागाने गिरणा परिसरातील झाडाझूडपात लपवून ठेवलेला सुमारे दोनशे ब्रास वाळूचा साठा जप्त केला.
Published on

Jalgaon Sand News : नदीपात्रातून वाळूउपसा बंदचे आदेश काढताच महसूल विभागाने गिरणा परिसरातील झाडाझूडपात लपवून ठेवलेला सुमारे दोनशे ब्रास वाळूचा साठा जप्त केला. यातच खेडी खुर्द (ता. जळगाव) येथील गिरणा नदीपात्रातून २०० ब्रास वाळूसाठा जप्त केला आहे.

नदीपात्रातून वाळू उपशास बंदीचे आदेश आहेत. त्यानुसार आता सप्टेंबरअखेरपर्यंत कोणत्याही प्रकारची वाळू नदीपात्रातून काढता येणार नाही. तसे केल्यास थेट वाळू चोरीचा गुन्हा डंपर चालकासह मालकांवर दाखल करून, चार ते पाच पट दंड वसूल केला जाणार आहे.

येथील गिरणा नदीपात्रास पथकाने भेट देऊन पाहणी केली असता, गिरणा नदीतून अवैध उत्खनन करून नदीकाठावर अंदाजे २०० ब्रास वाळूचा साठा विखुरलेल्या स्वरूपात आढळून आल्यामुळे तो जप्त करण्यात आला. हा वाळूसाठा प्रशासकीय इमारतीच्या आवारात जमा करण्यात आला आहे.

१५ दिवसांपूर्वीही अशाच प्रकारे बांभोरी येथील गिरणा नदीकाठावरील झुडपांमध्ये लपविलेला अंदाजे ४० ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला. शासनाच्या निर्देशानुसार सदर जप्त केलेल्या वाळूसाठ्याची निर्गती करण्यात येणार आहे.

Sand Policy
Maharashtra Sand Policy : स्वस्तात वाळूसाठी सोलापुरात भीमा नदीतील पाच ठिकाणे निश्‍चित

गिरणा नदीपात्रातील भोकर येथील वाळू गट शासकीय कामासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. त्याचा ताबा आता तहसीलदार, बांधकाम विभागाकडे असेल. या गटातील वाळूचा वापर केवळ शासकीय कामासाठी केला जाणे आवश्‍यक आहे.

‘जीपीएस’ प्रणालीशिवाय वाळू वाहनाना ई-पास मिळणार नाही. ही प्रणाली असलेली वाहनेच वाळूची ने-आण करू शकतील.

आता ४ महिने वाळू मिळणे बंद

राज्यस्तरीय पर्यावरण समितीने ९ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान नदीपात्रातून वाळू काढण्यास बंदी केली आहे. यामुळे आता आगामी चार महिने बांधकामास वाळू मिळणार नाही. या कालावधीत पावसाळ्यामुळे नदीत पाणी असते. त्यामुळे वाळू उपसा बंद असतो. असे असले, तरी वाळू उपसा होऊन त्याची विक्री होतेच.

वाळू चोरी रोखण्याचे मोठे आव्हान आता महसूल, पोलिस, आर.टी.ओ. यांच्यापुढे असणार आहे. ते रोखण्यासाठी विभाग काय उपाययोजना करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com