Illegal Money Lending  Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Money Lending : मृत सावकाराच्या परवान्यावर अवैध सावकारी

Co-Operative Department : सहकार विभागाच्या तीन पथकांनी तीन जागी धाडी घालून एका जागेवरून विविध बॅंकांचे धनादेश, शंभर रुपयांचे कोरे स्टॅम्पपेपर व दहा दुचाकी जप्त केल्या.

Team Agrowon

Amaravati News : परवानाधारक सावकाराच्या मृत्यूनंतर त्यांच्या परवान्यावर अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध सहकार विभागाने कारवाईचा बडगा उगारला. सहकार विभागाच्या तीन पथकांनी तीन जागी धाडी घालून एका जागेवरून विविध बॅंकांचे धनादेश, शंभर रुपयांचे कोरे स्टॅम्पपेपर व दहा दुचाकी जप्त केल्या.

अमरावतीतील महाजनपुरा परिसरातील आनंदनगर येथील रहिवासी अजय राजू बाबर हे परवानाधारक सावकार होते. त्यांच्या मृत्यूनंतर दोन महिला त्यांच्या परवान्यावर अवैधरीत्या सावकारी व्यवसाय करीत असल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने त्यांनी तीन सहायक निबंधकांच्या नेतृत्वात तीन स्वतंत्र पथक स्थापन करून छापे घालण्याचे आदेश दिले.

या पथकाने तीनही जागी छापे घालून एका महिलेच्या घरून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहेत. ही कागदपत्रे मृत अजय बाबर यांच्या हयातीतील आहेत. त्यांनी जिवंत असताना अधिकृत सावकारी परवाना असतानाही कर्जदारांच्या स्वाक्षरी असलेले विविध बॅंकांचे कोरे धनादेश, शंभर रुपयांचे कोरे स्टॅम्पपेपर व आरसी कागदपत्रे असलेल्या दहा दुचाकी घेऊन ठेवल्या होत्या.

हा सर्व दस्तऐवज संबंधित महिलेच्या निवासस्थानी त्यांनी ठेवला होता. त्यामुळेच आनंदनगर येथील त्यांच्या दुकानात अवैध दस्तऐवज सापडू शकले नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पथकाने तीन जागी छापे घातले. सहायक निबंधक स्वाती गुडधे यांच्या नेतृत्वातील पथकाने महिलेच्या घरून आक्षेपार्ह कागदपत्रांसह दहा दुचाकी जप्त केल्यात.

दुसरा छापा आनंदनगर येथील महिलेच्या निवासस्थानी सहायक निबंधक राजेश यादव यांच्या नेतृत्वात घालण्यात आली. मात्र या महिलेच्या घरून आक्षेपार्ह कागदपत्रे किंवा दस्तावेज सापडले नाहीत, तर तिसरा छापा आनंदनगर येथील मृत अजय बाबर यांच्या दुकानात सहायक निबंधक प्रीती धामने यांच्या नेतृत्वात घालण्यात आला.

तेथेही आक्षेपार्ह काहीच सापडले नाही. या प्रकरणाची पुढील चौकशी उपनिबंधक सचिन पतंगे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मृत अजय बाबर यांच्या कायेदशीर वारसांना चौकशीकरिता बोलावून सावकारी परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सहकार अधिकारी अविनाश महल्ले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Plantation Machine: आजऱ्यात होणार यंत्राद्वारे भातलागण

Onion Harvesting Delay: खानदेशात कांदा काढणी रखडली

Fish Industry Development: माफसू साकारणार ‘मत्स्य तंत्रज्ञान संकुल’

Sugarcane FPR Delay: सोलापुरात २७६ कोटी एफआरपी थकीत; कारखानदारांकडून दिशाभूल

Nashik District Bank: नाशिक जिल्हा बॅंकेला ७५३ कोटींचे भागभांडवल

SCROLL FOR NEXT