Illegal Money Lending : बँक कर्जाला विलंब म्हणजे सावकारीला आमंत्रण ; शेतकऱ्यांना वेळीच अर्थसहाय्य द्या

Agriculture Loan : महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमान्वये अवैध सावकारांविरुद्ध आतापर्यंत ५५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Illegal Money Lending
Farmer LoanAgrowon
Published on
Updated on

Akola News : गरजू शेतकऱ्यांना वेळीच कर्जवाटप व्हावे. तसेच अवैध सावकारीला कठोर पायबंद घालावा, असे निर्देश (कै.) वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. नीलेश हेलोंडे पाटील यांनी मंगळवारी (ता. १८) येथे दिले.

शेती स्वावलंबन मिशनची जिल्हास्तरीय बैठक ॲड. पाटील यांच्या अध्यक्षतेत लोकशाही सभागृहात झाली. या वेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रवीण लोखंडे, अग्रणी बँक व्यवस्थापक नयन सिन्हा, पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. जगदीश बुकतारे, आदिवासी विकास विभागाचे मोहन व्यवहारे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमान्वये अवैध सावकारांविरुद्ध आतापर्यंत ५५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण २१ प्रकरणांमध्ये नोंदणीकृत खरेदीखत अवैध असल्याचे घोषित करण्यात येऊन अवैध सावकारीच्या ओघात संपादित केलेली १५१.१५ एकर शेतजमीन, ४ हजार ९३९.५० चौरसर फुट जागा व एक राहती सदनिका संबंधितांना परत करण्यात आली आहे.

Illegal Money Lending
Illegal Money Lending : अमरावती जिल्ह्यात १३१ अवैध सावकार

सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात खरीप हंगामासाठी १ हजार ३०० कोटी व रब्बी हंगामाकरिता २०० कोटी असे एकूण १ हजार ५०० कोटी लक्ष्यांक देण्यात आला होता. त्यापैकी १५ फेब्रुवारीअखेर खरीप हंगामाकरिता १ लाख ६ हजार ७०८ सभासदांना ११५१.८२ कोटी कर्जवितरण व रब्बी हंगामासाठी ७ हजार ४४० सभासदांना ९५ कोटी १७ लक्ष पीककर्ज वाटप झाले, अशी माहिती बैठकीत सादर करण्यात आली.

ॲड. हेलोंडे पाटील म्हणाले, की एकही पात्र शेतकरी कर्ज मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी सर्वंकष प्रयत्न करावे. जिल्ह्यात चारा टंचाई उद्‍भवू नये यासाठी गायरान जमिनीवर चारा लागवड व्हावी.

Illegal Money Lending
Illegal Money Lending : अवैध सावकारीच्या कारणाने दोघांविरुद्ध पोलिसात तक्रार

पीकविमा योजनेच्या कंपनीच्या प्रतिनिधींचा तपशील, कौशल्य विकास कार्यक्रम आदींना ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्धी मिळावी. कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शेतकरीहिताचे उपक्रम राबवावेत. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचाही लाभ द्यावा.

बैठकीत शेताच्या बांधावर जैविक प्रयोगशाळेची उभारणी, प्रेरणा प्रकल्प, पंतप्रधान कृषी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, रेशीम लागवड, वन्य प्राणी नुकसानभरपाई, आदिवासी विभागाच्या शेतकऱ्यांसाठीच्या योजना आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com