
Akola News : अवैध सावकारीच्या व्यवहारातून जमीन हडपण्याच्या प्रयत्न होत असल्याच्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर आलेल्या अहवालावरून दोघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बार्शीटाकळी सहकारी संस्था सहायक निबंधकांनी या बाबत पोलिसांना पत्र दिले होते. त्यावरून आनंदा शिवराम मोहाडे (ता. शेंदुर्जना मोरे, ता. मंगरूळपीर, जि. वाशीम) आणि रमेश साहेबराव देशमुख (रा सावरखेड, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला) यांच्याविरुद्ध अवैध सावकारी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
सावरखेड येथील महिलेने या बाबत तक्रार केली होती. तिच्या पतीच्या उपचारासाठी दोन लाख रुपये घेतले होते. याबदल्यात जमीन गहाण ठेवली होती. दुर्दैवाने पतीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी रक्कम परतही केली. मात्र संबंधितांकडून शेती परत करण्यास टाळाटाळ केली जात होती. या प्रकरणी त्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.
महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमानुसार चौकशी अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर जिल्हा निबंधकांनी आदेश देत पोलिसात तक्रार दाखल करण्याची सूचना आपल्या अधिकाऱ्याला केली होती.
त्यावरून दाखल तक्रारीनुसार पोलिसांत पुढील कार्यवाही करण्यात आली. आनंदा मोहाडे व रमेश देशमुख यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही करण्यात आली. चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान विविध व्यवहारांची कागदपत्रे आढळून आलेली आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.