Mulberry Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Mulberry Cultivation : तुती लागवडीच्या नोंदणीकडे कृषी, जिल्हा परिषदेचे दुर्लक्ष

Ignore of Agriculture Zilla Parishad : रेशीम विकास अधिकारी कार्यालयाकडे १४० एकरसाठी नोंदणी झाली आहे. या नोंदणीकडे कृषी विभाग व जिल्हा परिषदेकडून मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षासाठी एक हजार एकरवर तुती लागवडीचे उदिष्ट रेशीम विभाग, कृषी विभाग व जिल्हा परिषदेला दिले आहे. परंतु आजपर्यंत केवळ रेशीम विकास अधिकारी कार्यालयाकडे १४० एकरसाठी नोंदणी झाली आहे. या नोंदणीकडे कृषी विभाग व जिल्हा परिषदेकडून मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा रेशीम विकास कार्यालयामार्फत तुती लागवडीला चालना मिळावी, यासाठी महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी शेतकऱ्यांना २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालय, नांदेड, संबंधित तालुक्यात तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयात नाव नोंदणी करता येईल.

नांदेड जिल्ह्याला यंदा रेशीम संचालनालयाने एक हजार एकरवर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात कृषी विभाग तीनशे एकर, रेशीम कार्यालय तीनशे एकर तर जिल्हा परिषद विभाग चारशे एकर क्षेत्राचा समावेश आहे.

जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्याची संयुक्त जबाबदारी असताना रेशमी विभाग वगळता जिल्हा परिषद तसेच कृषी विभागाने मात्र फारसे स्वारस्य दाखविल्याचे दिसून आले नव्हते. सध्या २० डिसेंबरपर्यंत नोंदणीचे काम सुरू आहे. या काळात रेशीम कार्यालयाकडून १४० एकरवर नोंदणी झाल्याची माहिती रेशीम विकास अधिकारी नृसिंह बावगे यांनी दिली.

तर कृषी विभाग व जिल्हा परिषदेकडून मात्र एकाही शेतकऱ्यांची नोंद घेतल्याची माहिती प्राप्त झाली नाही. रेशीम संचालनालयाकडून जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पत्र पाठवून अधीनस्त यंत्रणेच्या माध्यमातून रेशीम शेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून तुती लागवडीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

परंतु या कृषी व जिल्हा परिषदेकडून मात्र अद्याप कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे रेशीम संचालनालयाने पुन्हा या दोन्ही कार्यालयांना पत्र पाठविला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Sugarcane Price Protest: 'ओलम'कडून ३,५०० रूपये पहिली उचल जाहीर, 'स्वाभिमानी'च्या आंदोलनाला यश, कारखाना सुरु

Beekeeping Business: मधुमक्षिकापालन प्रशिक्षणातूव्यावसायिक संधींवर मार्गदर्शन

Mango Farmers: आंबा उत्पादकांना सुधारित निकषांनुसार भरपाई द्या; जावळे

Banana Farmers: खर्चही निघत नसल्याने केळीच्या बागांवर फिरवला रोटावेटर

Kolhapur Politics: कोल्हापुरात राजकीय कुस्ती! त्यांनी 'बात दूर दूर तक' न्यावी, मी त्यासाठी तयार, मंडलिकांचं मुश्रीफांना आव्हान

SCROLL FOR NEXT